ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांचे संपूर्ण कुटुंब गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहे. राऊत यांची सून गिरिजा राऊत यांनी केलेल्या तक्रारीवरून विनायक राऊत, गीतेश राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर विनायक राऊत यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अंतरिम जामीन अर्ज ठाणे न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्यावर ठाणे पोलिसांकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. २३ तारखेच्या सुनावणी आधी देखील पोलीस अटकेची कारवाई करू शकतात.
या अर्जावर सुनावणी होईपर्यंत न्यायालयाकडून राऊत यांना संरक्षण मिळणार नाहीच. तसेच पोलिस चौकशीसाठी कधीही विनायक राऊत यांना ताब्यात घेऊ शकतात. अटकपूर्व जामीनावर मुख्य सुनावणी २३ जुलैला होणार असून २३ तारखेपर्यंत विनायक राऊत यांना अटकेपासून संरक्षण मिळणार नसल्याचे समोर आले आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.