Vinayak Raut : ३ वर्षांपासून वेगळी राहतेय, मग आताच का…? विनायक राऊतांनी सुनेच्या तक्रारीमागचे ‘ते’ काळंबेरं उघड केले! | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

Breaking news
Breaking news

ठाणे: ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या कुटुंबावर सुनेने केलेल्या गंभीर आरोपांनंतर आता विनायक राऊत यांनी आपली पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. सुनेने केलेले छळ आणि जादूटोण्याचे सर्व आरोप फेटाळून लावत विनायक राऊत यांनी हे आरोप पूर्णपणे खोटे असल्याचा दावा विनायक राऊत यांनी केला आहे. “आम्ही कोणत्याही अघोरी प्रथा पाळत नाही, ते आरोप धादांत खोटे आहेत,” असे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

विनायक राऊत यांनी या वादावर पडदा उठवताना सुनेच्या हेतूवर गंभीर प्रश्न उपस्थित केले असून अनेक धक्कादायक दावे केले आहेत.

तक्रार करण्यामागे ‘काळंबेरं’; राऊतांचा सवाल

विनायक राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, “माझी सून गिरिजा राऊत ही गेल्या ३ वर्षांपासून माझ्या मुलासोबत राहत नाही. जर तिच्यावर अन्याय किंवा छळ झाला होता, तर तिने २०१८ ते २०२२ या चार वर्षांच्या काळात पोलिसांत तक्रार का केली नाही? आता इतक्या वर्षांनी अचानक अशी तक्रार करण्यामागे नक्कीच काहीतरी काळंबेरं (गुप्त हेतू) आहे.”

सुनेच्या अव्वाच्या सव्वा मागण्या

विनायक राऊत यांनी थेट आकड्यांचा उल्लेख करत सुनेवर गंभीर आर्थिक आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, गिरिजा राऊत यांच्याकडून कुटुंबाकडे अव्वाच्या सव्वा मागण्या केल्या जात होत्या. विनायक राऊत यांनी म्हटले की,  सुन गिरिजा राऊत यांनी म्हटले की, दरमहा २ लाख रुपये घरखर्चासाठी मागितले होते. मुंबईत ३ बीएचके (3 BHK) टेरेस फ्लॅट आणि एक ऑटोमॅटिक कार देण्याची मागणी केली होती. याशिवाय, थेट ५ कोटी रुपयांची रोख रक्कम मागण्यात आली होती, असेही त्यांनी दावा केला.

राऊत यांनी पुढे सांगितले की, “एकूण १० ते १२ कोटी रुपयांची ही अवाढव्य मागणी होती. आम्ही तिच्या या कायदेशीर किंवा नैतिकदृष्ट्या अयोग्य असलेल्या मागण्या मान्य केल्या नाहीत. याच रागातून आणि मागण्या पूर्ण न झाल्यामुळेच सुनेने आमच्यावर हे असे सूडबुद्धीने खोटे आरोप केले आहेत,” असा दावा विनायक राऊत यांनी केला आहे. या नव्या खुलाशानंतर आता या कौटुंबिक आणि कायदेशीर वादाला एक वेगळे वळण मिळाले असून पोलीस या दोन्ही बाजूंचा तपास करत आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/

Vinayak Raut : ३ वर्षांपासून वेगळी राहतेय, मग आताच का…? विनायक राऊतांनी सुनेच्या तक्रारीमागचे ‘ते’ काळंबेरं उघड केले!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *