Tv Actress Eva Grover: आमिर खानच्या सावत्र भावाशी लग्न, इंटिमेट होताना मारहाण, दिग्दर्शकांशी संबंध ठेवण्यास दबाव; प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा


Eva Grover on Hyder Ali Khan: टीव्ही विश्वातील आम्ही अशा एका अभिनेत्रीबद्दल सांगत आहोत, जिने तिच्या वैयक्तिक आयुष्यात  5 वर्षे हिंसाचार (Eva grover) आणि अत्याचार सहन केला आहे. अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील (Hyder ali khan) बरेच खुलासे उघड केले आहेत.  अभिनेत्रीने सांगितले की, इंटिमेट (Entertainment) क्षणांमध्ये अभिनेत्रीचा पती तिच्यावर मारहाण करायचा.  आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत, ती अभिनेत्री म्हणजे इव्हा ग्रोव्हर. अभिनेत्रीचं लग्न आमिर खानचा सावत्र भाऊ हैदर अली खान याच्याशी झाले होते. आपल्या लग्न दरम्यानच्या आठवणींना उजाळा देत असताना इव्हा भावुक झाली होती. 

इव्हा ग्रोव्हरने आपल्या एक्स पतीवर धक्कादायक आरोप केले होते (Eva Grover Opens Up About Five Years of Alleged Abuse in Marriage)

सिद्धार्थ कन्ननसोबतच्या एका मुलाखतीत इव्हाने सांगितले की,  ‘आम्ही फक्त 18 दिवस एकमेकांना डेट करत होतो.  19 व्या दिवशी हैदर खानने तिला लग्नाची मागणी घातली होती. हैदर वेगळ्या धर्माचा असल्यामुळे आई लग्नाला  कधीच समंती देणार नाही, हे माहित होते’.  घरातून पळून गेली आणि तिने हैदरशी लग्न केले, असं इव्हाने सांगितलं. लग्नानंतर जेव्हा ती तिच्या आईकडे गेली. तेव्हा तिची आई खूप निराश झाली होती.  तिनं आपल्या मुलीसोबतचे नाते संपवण्याचा निर्णय घेतला होता.

इव्हाने मुलाखतीत सांगितलं की,  तिच्या एक्स पतीला स्किझोफ्रेनियाचा त्रास होता.   तिला याची काहीच कल्पना नव्हती. जेव्हा दोघांमध्ये जेव्हा इंटिमेट क्षण यायचे, तेव्हा हैदर अत्यंत हिंसक होऊन तिच्यावर हल्ला करायचा.  कदाचित  त्याला असे करण्यात आनंत मिळत असावा, असं तिनं सांगितलं. तिच्या संपूर्ण शरीरावर व्रण उठले होते.  एवढंच नाही तर, इव्हाने आपल्या पतीबाबत आणखी एक धक्कादायक खुलासा केला होता. अधिक काम मिळवण्यासाठी तसेच जास्त पैसे कमावण्यासाठी हैदरने तिच्यावर निर्माते आणि दिग्दर्शकांशी संबंध जोडण्याचा दबाव टाकला होता, असा खुलासा इव्हाने मुलाखतीत केला होता. 

तब्बल 5 वर्ष इव्हाने हा हिंसाचार सहन केला होता.  लग्नाच्या 5 वर्षांनंतर इव्हाने आपल्या आयुष्यातील मोठा निर्णय घेतला. तिनं आपल्या पतीला काडीमोड दिला. तसेच आपल्या आईकडे अभिनेत्री परतली.  दोघांना एक मुलगी देखील आहे.  इव्हाने आपल्या मुलीविषयही मुलाखतीत खुलासा केला होता.   तिनं साधारण 10 वर्षे आपल्या लेकीचा चेहरा पाहिला नव्हता.  पण आज तिची मुलगी तिला चांगल्या प्रकारे समजून घेते.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

41 व्या वर्षी अभिनेत्रीचं दुसरं लग्न, विदेशी उद्योगपतीसोबत बांधली साताजन्माची गाठ; रोमँटिक Kiss PHOTO व्हायरल



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *