रोहित आणि विराट स्वत:साठी लॉर्ड्सवर खेळत होते? लॉर्ड्स वनडे सामना गमावल्यानंतर आर अश्विन भडकला – Marathi News | Ravichandran Ashwin said he spotted Rohit Sharma Virat Kohli and KL Rahul tentativeness while batting against England


रोहित आणि विराट स्वत:साठी लॉर्ड्सवर खेळत होते? लॉर्ड्स वनडे सामना गमावल्यानंतर आर अश्विन भडकलाImage Credit source: PTI

इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका जिंकण्याची संधी भारताने लॉर्ड्सवर गमावली. इंग्लंडने विजयासाठी 387 धावांचं आव्हान ठेवलं होतं, पण भारताला 360 धावा करता आल्या. भारताने हा सामना 27 धावांनी गमावला आणि मालिका हातून गेली. खरं तर एक वेळ अशी होती की हा सामना भारत सहज जिंकेल. पण 40व्या षटकापासून चित्र बदललं आणि भारताचा पराभव निश्चित होत गेला. लॉर्ड्सवरील पराभव आणि मालिका गमावल्यानंतर माजी क्रिकेटपटू आर अश्विनने संताप व्यक्त केला आहे. त्याने संघातील वरिष्ठ खेळाडूंच्या वर्तवणुकीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आर अश्विनच्या मते, धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुलसारखे खेळाडू खेळपट्टीवर अडखळत खेळताना दिसले. आर अश्विनने युट्यूबवर भारतीय फलंदाजांच्या मानसिकतेवर भाष्य केलं.

काय म्हणाला आर अश्विन?

आर अश्विनने स्पष्ट केलं की, “लॉर्ड्सची खेळपट्टी थोडी कठीण होती पण केएल राहुल, विराट कोहली आणि रोहित शर्मा फलंदाजी करत होते, तेव्हा मला त्यांच्या खेळात एक प्रकारचा संकोच किंवा द्विधा मनःस्थिती दिसत होती. एक फटका सामना जिंकण्यासाठी मारला जातो. तर दुसरा फटका असा असतो की, आम्हाला सामना जिंकायचा आहे, पण मला धावा करणेही आवश्यक आहे. जर खेळाडूंना संघ व्यवस्थापनाकडून पूर्ण सुरक्षितता मिळाली, तर त्यांच्या खेळातून हा संकोच पूर्णपणे नाहीसा होईल.”

भारतासाठी इंग्लंड दौरा एक नकोशा स्वप्नासारखा ठरला आहे. टी20 मालिकेत 0-4 ने मात खाल्ली, तर वनडे मालिकेत 1-2 ने पराभव झाला. लॉर्ड्सवरील शेवटच्या सामन्यात रोहित शर्माची बॅट चांगलीच तळपली. पहिल्या दोन सामन्यात निराशाजनक कामगिरीनंतर खरं तर त्याच्यावर दडपण होतं. त्यातही त्याला पुढच्या मालिकेतून डावललं जाणार, अशा वावड्या उठल्या होत्या. त्यामुळे रोहित शर्मावर दडपण असणार, असं त्याचे चाहते सोशल मीडियावर पोस्ट करताना व्यक्त होत आहेत. दुसरीकडे विराट कोहलीने 60 चेंडूत 74 धावा केल्या. पण विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. केएल राहुलचा डावही 12 धावांवर आटोपला.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *