पुणे : पुणे शहरातील फुरसुंगी परिसरातील मंतरवाडी याठिकाणी एका व्यवसाय असणाऱ्या फॅक्टरीवर (Pune Firing News) गोळीबार झाला आणि या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना उशिरा रात्री घडलेल्या या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण (Pune Firing News) निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. विशेष म्हणजे, या गोळीबारानंतर सोशल मीडियावर व्हायरल (Pune Firing News) झालेल्या एका पोस्टमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित व्यक्तींनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करण्यात आला आहे.(Pune Firing News)
मिळालेल्या माहितीनुसार, मंतरवाडी परिसरात असलेल्या व्यवसाय असणाऱ्या फॅक्टरीवर लक्ष्य करत अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ऑफिसच्या परिसरात गोळ्यांच्या खुणा आढळून आल्या आहेत. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. तर, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये अमूल चमारिया आणि सनी चमारिया यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये, “आम्ही अनेक वेळा फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र आमच्या कॉल्सकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आम्हाला हा मार्ग स्वीकारावा लागला,” असा दावा करण्यात आला आहे. तसेच संबंधितांना पुढील काळात गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते, अशा स्वरूपाच्या धमक्याही पोस्टमध्ये देण्यात आल्या आहेत.(Pune Firing News)
Pune Firing News : परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त
या पोस्टमध्ये आरजू बिश्नोई, शुभम लोंकार आणि टायसन बिश्नोई या नावांचा उल्लेख असून त्यांनी गोळीबाराची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या पोस्टची सत्यता आणि त्यामागे खरोखरच लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात आहे का, याबाबत पोलिसांकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. हा प्रकार खंडणी, व्यावसायिक वाद किंवा इतर कोणत्या कारणातून घडला याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे पुण्यातील व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Pune Firing News : प्रत्येकी ५ कोटी द्या, बिश्नोई गँगने मागितली पुण्यातील स्टील व्यावसायिकाला खंडणी
पुण्यातील मंतरवाडी भागात असलेल्या एका स्टील व्यावसायिकाच्या गोडाऊनवर काल रात्री दोन तरुणांनी गोळीबार करत दहशत माजवली. याप्रकरणी पुणे पोलिसांकडून तपास सुरू असून संबंधित स्टील व्यवसायिकाला आणि त्याच्या भागीदारांना तब्बल 50 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. दरम्यान या गोळीबाराची जबाबदारी बिश्नोई गॅंगच्या सदस्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत स्वीकारली आहे. पुणे पोलिसांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून संबंधित गोळीबार करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पथकं रवाना केली असून घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेज देखील जप्त केले आहेत अशी माहिती पुणे शाखेचे पोलीस उपायुक्त गौहर हसन यांनी दिली आहे.
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story