Numerology: तुमच्या जन्मतारखेनुसार ‘या’ जन्मतारखेचा जोडीदार परफेक्ट असेल? ज्यानं भाग्य फळफळेल, नात्यात आनंद टिकेल, अंकशास्त्र सांगते…


Numerology: अनेकदा आपण पाहतो. की प्रेम जीवन असो… किंवा वैवाहिक जीवन…जोडीदारांमध्ये लहानसहान गोष्टींवरून वारंवार मतभेद होतात, वारंवार गैरसमज, वाद किंवा सुसंगततेचा अभाव जाणवतो.. अंकशास्त्रानुसार पाहायला गेलं तर, नात्याच्या दीर्घकालीन यशामध्ये तुमची जन्मतारीख तसेच मूलांक महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. कारण काही अंक उत्तम सामंजस्य निर्माण करतात असे मानले जाते, तर इतर अंकांसोबत नाते टिकवण्यासाठी अधिक प्रयत्नांची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत, योग्य अंकांचे संयोजन नात्यात आनंद आणि स्थिरता आणू शकते. अंकशास्त्रानुसार, आज आपण तुमच्या मूलांकावरून कोणत्या मूलांकांची जोडी परफेक्ट ठरेल? हे जाणून घेणार आहोत..

तुमचा मूलांक कसा जाणून घ्याल? (Numerology)

अंकशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीचा एक मूलांक (Root Number) असतो. हा मूलांक जन्मतारखेच्या बेरजेवरून काढला जातो आणि त्यावरून व्यक्तीचा स्वभाव, नातेसंबंध आणि जोडीदाराशी जुळणारे मूलांक ठरवले जातात. उदाहरणार्थ, जर तुमच्या जन्मतारखा 22, 4 आणि 13 असतील, तर तुमचा मूलांक 4 असेल. मूलांक शोधण्याची पद्धत: जर जन्मतारीख 22 असेल, तर 2+2 केल्यास उत्तर 4 येईल.

कोणत्या मूलांकाची कोणासोबत उत्तम जोडी जुळते?

मूलांक 1 (जन्म तारीख – 1, 10, 19, 28)

अंकशास्त्रानुसार, ज्यांचा अंक 1 आहे त्यांच्यावर सूर्याचे अधिपत्य आहे, 2, 3, 5 आणि 9 मूलांकाच्या व्यक्ती सर्वोत्तम जोडीदार ठरतात. 4 मूलांकाच्या व्यक्तींसोबत मतभेद होऊ शकतात.

मूलांक 2 (जन्मतारीख – 2, 11, 20 29)

अंकशास्त्रानुसार, ज्यांचा अंक 2 आहे, त्यांच्यासाठी 1, 3 आणि 5 मूलांकाच्या व्यक्तींसोबत उत्तम जुळवून घेतात. 8 मूलांकाच्या व्यक्तींसोबत सामंजस्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागू शकतात.

मूलांक 3 (जन्मतारीख – 3, 12, 21, 30)

अंकशास्त्रानुसार, ज्यांचा अंक 3 आहे, 1, 3, 5 आणि 9 मूलांकाच्या व्यक्तींसोबत आनंदी आणि यशस्वी नाते निर्माण होते.

मूलांक 4 (जन्मतारीख – 4,13, 22, 31)

अंकशास्त्रानुसार, ज्यांचा अंक 4 आहे, 5, 6 आणि 8 मूलांकाच्या व्यक्तींसोबत चांगली जोडी जमते. 4 मूलांकाच्या व्यक्तींसोबतही समजूतदार नाते राहू शकते.

मूलांक 5 (जन्मतारीख – 5, 14, 23)

अंकशास्त्रानुसार, ज्यांचा अंक 5 आहे, जवळपास सर्व मूलांकांसोबत जुळवून घेण्याची क्षमता असते. विशेषतः 1, 3, 5 आणि 6 मूलांकाचे जोडीदार शुभ मानले जातात.

मूलांक 6 (जन्मतारीख – 6, 15, 24)

अंकशास्त्रानुसार, शुक्र हा अंक 6 चा स्वामी मानला जातो 5, 8 आणि 9 मूलांकाच्या व्यक्ती भाग्यवान जोडीदार ठरतात. वैवाहिक जीवन सुखी राहण्याची शक्यता असते.

मूलांक 7 (जन्मतारीख – 7, 16, 25)

अंकशास्त्रानुसार, 1, 2 आणि 5 मूलांकाच्या व्यक्तींसोबत मानसिक समाधान आणि स्थैर्य मिळते.

मूलांक 8 (जन्मतारीख – 8, 17, 26)

अंकशास्त्रानुसार, 4, 5 आणि 6 मूलांकाच्या व्यक्तींसोबत सर्वोत्तम जुळवून घेतात. नात्यांबाबत गंभीर आणि जबाबदार असतात.

मूलांक 9 (जन्मतारीख – 9, 18, 27)

अंकशास्त्रानुसार, 1, 3 आणि 6 मूलांकाच्या व्यक्ती उत्कृष्ट जोडीदार ठरतात. प्रेम आणि रोमँस दीर्घकाळ टिकून राहतो..

टीप: अंकशास्त्र हे केवळ एक मार्गदर्शक तत्त्व आहे. कोणत्याही नात्याचे यश केवळ अंकावरच नाही, तर परस्पर विश्वास, आदर आणि समजूतदारपणावरही अवलंबून असते. त्यामुळे, अंकासोबतच, नात्यामध्ये प्रेम आणि संवादावर भर देणे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा

Goddess Kamakhya: देवी कामाख्याचे मासिक पाळीचे ‘ते’ 3 दिवस, जिथे नदीचं पाणीही होतं लाल! अंबुबाची यात्रेला सुरूवात, रहस्य जाणून थक्क व्हाल…

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *