Supriya Sule: तू गप्पबस, तुला कळत नाही…; सुप्रिया सुळेंना शरद पवार सर्वांसमोर असं का म्हणाले? – Marathi News | Keep Quiet You Donot Understand Supriya Sule Reveals Why Sharad Pawar Said It


गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सतत काही ना काही घडामोडी घडताना दिसत आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीची बरीच चर्चा रंगली. यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी नेमकं काय घडलं होतं? याबाबत माहिती दिली आहे. मी लेक असल्याने त्यांच्यासोबत असते. ते ओव्हर इंडिपेंडट असतात. ते हात करून म्हटले तू गप्प बस. तुला कळत नाही असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

नेमकं काय घडलं?

पत्रकार परिषदेत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शरद पवार हे विधासभेत शिंदेंना भेटले तो योगायोगच होता. पवार साहेब चालत गेले. विधानसभेत. मी लेक असल्याने त्यांच्यासोबत असते. तुम्ही जास्त चालू नका, तुम्ही जाऊ नका असं म्हणत असते. ते ओव्हर इंडिपेंडट असतात. ते हात करून म्हटले तू गप्प बस. तुला कळत नाही. म्हणून ते चालत सुटले.

शरद पवार आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीविषयी

पुढे शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीविषयी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, परत येताना काही आमदारांनी म्हटले बऱ्याच दिवसाने आले. आमच्याशी बोलायचं आहे. बाजूच्या रुममध्ये ते गेले. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचे ऑफिस फिक्स असते. बाकीच्यांच्या केबिन फिक्स नसतात. राजकीय आयुष्यात कोणतीच जागा फिक्स नसते. त्या भ्रमात मी नाही. चारपाच लोक भेटले. हा शिंदे साहेबांचा मोठेपणा. नाही तर बातमी कराल. चांगल्याला चांगले म्हटलं पाहिजे. शिंदे आले त्यांनी पवार साहेबांना बुके दिले आणि ते निघून गेले. त्यावर राऊत साहेब नाराज झाले. मी त्यांना फोन करून ते सांगितलं. त्यानंतर राऊत साहेबांनी नाराजी नसल्याचं सांगितलं.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, काल माझा ब्रेकफास्ट योगी आदित्यनाथ सोबत होता. लंच डिंपल यादवांसोबत होता. मग त्यांना का भेटला असा प्रश्न मला का नाही विचारत. आम्ही वन नेशन वन इलेक्शनसाठी मी योगींना भेटलो. डिंपल यादव आणि अखिलेश यांच्याशी आमचे कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे त्यांना भेटलो. त्यामुळे कुणी कुणाला भेटलं तर कटकारस्थान असतं हे काढून टाका. जयंत पाटील हे मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन भेटले. नगराध्यक्षांच्या विषयावर बोलायला गेले. गाडीने गेले गाडीने आले. हुडी घालून गेले नाही. तिथे सुनील तटकरे आणि पटेल होते की नाही माहीत नाही. तसेच हा प्रश्न तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारा. त्यांच्या घरी कोण जातं आणि कोण नाही हे त्यांनाच माहीत. आमच्या पक्षाचे नेते ईश्वरपूरच्या कामासाठी गेले होते. ऑफिशियली गेले होते. परत आले. पुढच्या दरवाजाने गेले. परत आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *