याठिकाणी सध्या 8 हून अधिक प्रकारचे पोहे मिळतात. यामध्ये इंदोरी पोहे, मटकी पोहे, दही पोहे, तरी पोहे, कांदे पोहे, दुधी पोहे आणि पनीर पोहे यांचा समावेश आहे. याशिवाय बटाटा वडा, समोसा, कचोरी, आलू पराठा, पुरी भाजी, मिसळ असे पदार्थही येथे मिळतात. त्याच्याच जोडीला चहा, कॉफी, लिंबू चहा, कोल्ड कॉफी, आईस टी तसेच मस्तानीही ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. सध्या या व्यवसायातून त्यांची महिन्याला 3 लाखांची उलाढाल होत आहे.
