Influencer: प्रसिद्ध यूट्यूबर – इन्फ्ल्युएंसरला घरात घुसून संपवलं; मेहुण्यानेच साथीदारांसह रचला कट, कारण काय?


Masood Chandi: सोशल मीडिया (Social media) जगतातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. फिटनेस कंटेट क्रिएटर आणि यूट्यूबर  मसूद चांदी (Masood Chandi) उर्फ शैख महबूब (Shaikh Mehboob) याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मसूद चांदी हा हैदराबाद येथील गोलकोंडा परिसरातील रहिवासी होता.   तो यूट्यूबवर व्हिडीओ शेअर करायचा. त्याला यूट्यूबमुळे बरीच प्रसिद्धी मिळाली होती. ही घटना शुक्रवारी दुपारी 3:20, 3:30च्या सुमारास घडली.   माहितीनुसार, काही तरुणांनी त्याच्या घरात घुसून लोखंडी सळ्या आणि जिमच्या सामानाने त्याच्यावर हल्ला केला. ज्यामुळे तो रक्तबंबाळ झाला. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन पळून गेले.  दरम्यान, या भीषण हल्ल्यात मसूद चांदीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. 

मसूद चांदीची हत्या नेमकी कुणी केली? (Masood Chandi Influencer)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मुख्य आरोपी शेख सोहेल, जो मेहबूबच्या पत्नीचा भाऊ आहे, तो आपल्या दोन साथीदारांसह (अफ्फू आणि जाबीर)थेट घरात घुसला.  सोहेल आणि त्याच्या दोन साथीदारांनी मिळून मेहबूबवर लोखंडी सळीने वार केले. या हल्ल्यात मेहबूब रक्तबंबाळ झाला होता. त्याचा जागेवरच मृत्यू झाला, अशी माहिती समोर आली आहे. 

मेहबूबच्या हत्येमागील हेतू काय?

या धक्कादायक प्रकरणानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांच्या तपासात असे आढळून आले की,  मेहबूबनं गोलकोंडाच्या बडा बाजार परिसरातील एका तरुणीशी 18 महिन्यांपूर्वी विवाह केला होता.  काही वाद झाल्यानंतर आपली पत्नी आणि मुलाला त्यानं माहेरी पाठवलं होतं.  यामुळे तणाव निर्माण झाला होता. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, सोहेल आणि  मसूद यांच्यात काही काळापासून कौंटुबिक वाद सुरू होते. 

ॉकौटुंबिक वादातून तणाव अधिक वाढत गेला. पोलिसांनी दीर्घकाळापासून सुरू असलेला कौटुंबिक वाद हे हत्येमागील कारण असल्याचं म्हटलं आहे.  दरम्यान, आरोपींनी मसूदची हत्या नेमकी का केली? कौटुंबिक वाद व्यतिरिक्त दोघांमध्ये नेमकं काय बिनसलं? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन, मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करुन  त्यांना न्यायालयासमोर हजर करण्याचा प्रयत्न करु, शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं. 

तक्रारीनुसार, पोलिसांनी  आरोपीयांवर BNS कलम 103 (1) (हत्या)अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपी सध्या फरार असून, त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी तीन विशेष पथके तयार केली आहेत. दरम्यान, ही घटना गोलकोंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसाढवळ्या घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

लैंगिक पीडित महिलांवर नको नको ते बोलला, प्रणित मोरेच्या ‘370 बिर्याणी’ प्रकरणानंतर आणखी एक कॉमेडियन वादाच्या भोवऱ्यात, VIDEO



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *