FPI : विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात थांबेनात, जूनच्या 10 दिवसात 62853 कोटी काढून घेतले, नेमकी कारणं काय? 


FPI नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता संघर्ष, लांबलेला शांतता करार त्यामुळं गेल्या आठवड्यात झालेले हल्ले प्रति हल्ले, जागतिक आर्थिक वाढ, रुपया कमजोर होणे या सारख्या इतर कारणांमुळं विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी जून महिन्यातील 10 दिवसात मोठ्या प्रमाणात पैसे काढून घेतले आहेत. भारतीय शेअर बाजारातून विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी 62853 कोटी रुपये काढून घेतले आहे. नॅशनल सिक्यूरिटीज डिपॉजिटरी लिमिटेडच्या आकडेवारीनुसार 2026 मध्ये एफपीआयनं भारतीय बाजारतून 2.87 लाख कोटी रुपये काढून घेतले आहेत. 2025 मध्ये FPI नं भारतीय बाजारातून 1.66 लाख कोटी रुपये काढून घेतले होते.  

बजाज ब्रोकिंगचे (रिसर्च) उपाध्यक्ष पबित्रो मुखर्जी यांनी पुढील आठवड्यात एफपीआयची गुंतवणूक अमेरिका आणि इराण शांतता करार, अमेरिकन फेडरल ओपन मार्केट कमिटीचे धोरणात्मक निर्णय आणि बँक ऑफ जपान यांच्या व्याज दराच्या निर्णयांवर तसेच प्रमुख केंद्रीय बँकांच्या निरिक्षणांवर अवलंबून असेल, असं म्हटलं.

जून महिन्यात 62,853  कोटी काढून घेतले 

फेब्रुवारी 2026 मध्ये भारतीय बाजारात विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली होती. जी 22615 कोटी रुपयांची होती.  त्यांनी जानेवारीत भारतीय बाजारातून 35962 कोटी, मार्चमध्ये विक्रमी 1.17 लाख कोटी रुपये, एप्रिलमध्ये 60,847 कोटी,मे महिन्यात 32,963 कोटी काढून घेतले होते. आता जूनच्या पहिल्या दोन आठवड्यात विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून 62,853 कोटी रुपये काढून घेतले आहेत. 

मॉर्निंगस्टार इन्वेस्टमेंट रिसर्च इंडियाचे प्रमुख, संचालक हिमांशू श्रीवास्तव यांनी देखील प्रमुख केंद्रीय बँकांच्या व्याज दरांची दिशा, भू राजनैतिक घटनाक्रम आणि जागतिक वृद्धी संदर्भातील समस्या या कारणांमुळं गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे. या परिस्थितीत गुंतवणूकदार जोखीम कमी करण्याची रणनीती राबवतात. यामुळं बाजारातून पैसे काढून विकसित बाजारात आणि सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करतात.

आर्थिक जाणकारांच्या नुसार, वाढत्या बाजारांच्या तुलनेत भारतीय कंपन्यांचे शेअरचं उच्च मूल्यांकन यामुळं विदेशी गुंतवणूकदार अधिक सतर्क होतात. बाजार जाणकारांच्यानुसार रुपयामध्ये सातत्यानं घसरण झाल्यानं देखील परिणाम होतो. 

भारतीय चलन 2026 मध्ये सहा टक्के घसरण झाली आहे. गेल्या एका वर्षात 10 टक्के घसरण झाली आहे. शेअर बाजारात विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी एफएआरद्वारे बाँड प्रतिभूतीमध्ये 13200 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. आर्थिक वर्ष 2026 मध्ये आतापर्यंत 26000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.  

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *