Actress Daveigh Chase Death: संचिता उगलेपाठोपाठ आणखी एका प्रसिद्ध तरुण अभिनेत्रीचा मृत्यू, 35व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


Actress Daveigh Chase Death: ‘कुमकुम भाग्य’ (Kumkum Bhagya) फेम अभिनेत्री संचिता उगले (Sanchita Ugale) हिनं टोकाचं पाऊल उचलत, आपलं आयुष्य संपवलं. संचिताच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. संचितानं आत्महत्या केल्यामुळे अख्खी इंडस्ट्री हादरली आहे. अशातच आता आणखी एक खळबळ वाढवणारी बातमी समोर आली आहे. संचितापाठोपाठ आणखी एका तरुण अभिनेत्रीचा मृत्यू झालाय. 35 वर्षांची ‘द रिंग’ (The Ring) फेम अभिनेत्री डेव्ही चेज (Daveigh Chase). तिच्या अकाली निधनानं अख्ख्या इंडस्ट्रीला मोठा धक्का बसलाय. 

प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलेल्या डेव्ही चेस हिचं वयाच्या 35व्या वर्षी निधन झालंय. आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या आणि आवाजाच्या जोरावर जगभरातील प्रेक्षकांच्या मनात तिनं आपलं अढळ स्थान निर्माण केलेलं. त्यामुळे तिच्या अशा अचानक जाण्यानं चाहत्यांना धक्का बसला आहे. डेव्ही काही दिवसांपासून एका गंभीर आजाराशी झुंज देत होती. तिला गंभीर ब्लड इन्फेक्शनची लागण झालेली. ज्यामुळे तिला खूप त्रास सहन करावा लागलेला. डेव्हीला तिच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसांत खूप त्रास सहन करावा लागला. नंतर इन्फेक्शन एवढं वाढलं की, हळूहळू त्यानं तिच्या संपूर्ण शरीराचा ताबा घेतला. इन्फेक्शनमुळे तिच्या शरीरातील अवयवांनी हळूहळू काम करणंच बंद केलेलं. डेव्हीच्या बॉयफ्रेंडनं अभिनेत्रीच्या निधनाच्या बातमीला पुष्टी केलीय.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री डेव्ही हिचं निधन मंगळवारी झालंय. डेव्ही हिला मेनिन्जाइटिस (Meningitis) आणि ब्लडस्ट्रीम इन्फेक्शन (रक्तातील संसर्ग) मुळे त्रास होत होता, ज्याचं नंतर गंभीर इन्फेक्शनमध्ये रूपांतर झालं आणि वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी तिनं अखेरचा श्वास घेतला.

अभिनेत्री डेव्ही चेज हिची कारकीर्द

अभिनेत्री डेव्ही चेज ही अमेरिकन अभिनेत्री आणि व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. तिचा जन्म 24 जुलै 1990 रोजी Las Vegas इथे झालेला. तिनं डिस्नीचा लोकप्रिय अॅनिमेटेड सिनेमा Lilo & Stitch मधील ‘लिलो’ या मुख्य पात्राला आवाज दिलेला. तसेच, तिनं गाजलेला हॉरर सिनेमा ‘द रिंग’ मधील ‘समारा मॉर्गन’ या भयावह पात्राची भूमिका साकारून विशेष लोकप्रियता मिळवली. बालकलाकार म्हणून कारकीर्द सुरू केलेल्या डेव्ह चेस हिनं अभिनयासोबतच अनेक अॅनिमेशन प्रोजेक्ट्समध्ये व्हॉइस आर्टिस्ट म्हणूनही काम केलंय.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

TV Actress Sanchita Ugale End Life: हिंदी मालिकाविश्वात नाव कमावणाऱ्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनं आयुष्य संपवलं; संचिता उगलेचं टोकाचं पाऊल

ABP Majha च्या बातम्या LIVE





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *