Shreyas Iyer : टीम इंडियाचं विजयाच्या ट्रॅकवर कमबॅक, झिम्बाब्वेवर 7 विकेटनं विजय, श्रेयस अय्यरनं पहिल्या विजयाचं श्रेय कोणाला दिलं?


नवी दिल्ली : भारतानं कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील पहिला टी 20 विजय मिळवला आहे. आयर्लंड आणि इंग्लंड विरोधातील मालिकेत पराभव स्वीकारल्यानंतर झिम्बाब्वेमध्ये भारताला पहिला विजय मिळाला. भारतानं पहिल्या टी 20 सामन्यात 7 विकेट मिळवला. कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात आठव्या सामन्यात पहिला विजय मिळाला आहे. 

श्रेयस अय्यरनं पहिल्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. मयंक यादव, वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीचं कौतुक केलं. मयंक यादवनं मॅचच्या पहिल्याच बॉलवर विकेट घेतली. दुसरीकडे वैभव सूर्यवंशीनं 18 बॉलमध्ये अर्धशत केलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक करणारा खेळाडू वैभव सूर्यवंशी ठरला आहे. 

पहिल्या विजयानं श्रेयस अय्यर आनंदी 
कर्णधार म्हणून श्रेयस अय्यर म्हणाला की, कर्णधार म्हणून पहिला विजय, यापेक्षा जास्त आनंद मिळू शकत नाही. मला खेळपट्टीतून अधिक बाऊन्सची अपेक्षा होती, तसंच झालं, असं अय्यर म्हणाला. 

अय्यरनं टीमचं कौतुक करताना म्हटलं की मयंकनं आम्हाला चांगली सुरुवात मिळवून दिली, त्यांना फटके मारण्याची संधी दिली नाही. वैभवनं फलंदाजी करताना आम्हाला चांगली सुरुवात करुन दिली. तो निर्भीड असून फलंदाजीकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. जेव्हा तो मैदानावर उतरला तेव्हा आत्मविश्वासानं भारलेला असतो.  

श्रेयस अय्यरचं कर्णधार पदाचं रेकॉर्ड

आयर्लंड दौऱ्यावर श्रेयस अय्यरनं पहिल्यांना भारताच्या टी 20 संघाचं कर्णधारपद भूषवलं होतं. आयर्लंड आणि इंग्लंड विरोधातील मालिकेत भारताचा पराभव झाला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात आठव्या सामन्यात भारताला पहिला विजय मिळाला आहे. सहा सामन्यात भारताचा पराभव झाला, तर एक सामना पावसामुळं रद्द झाला. झिम्बाब्वे विरोधात श्रेयस अय्यरनं 28 धावा केल्या.

दरम्यान, भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील दुसरा आणि तिसरा सामना 25 आणि 26 जुलै रोजी होणार आहे. राहिलेले दोन्ही सामने हरारे स्पोर्टस क्लब येथे होणार आहेत. सलग दोन मालिका गमावल्यानंतर तिसऱ्या मालिकेत भारतीय संघ विजय मिळवतो का ते पाहावं लागेल. 

भारताचा संघ

अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, श्रेयस अय्यर (कर्णधार), शिवम दुबे, रिंकू सिंग, सूर्यांश शेडगे, प्रिन्स यादव, यश ठाकूर, अशोक शर्मा, मयंक यादव, वैभव सूर्यवंशी, प्रभसिमरन सिंग, हर्ष दुबे, रवी बिन्नोई.

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *