Shraddha Pawar:एका गाण्याने प्रचंड लोकप्रियता ; 24 वर्षांची देखणी रीलस्टार स्टार प्रवाहची नायिका झाली; ‘या’ लोकप्रिय दिग्दर्शक जोडीने दिली संधी


Star Pravah Reelstar Lead Role:अलीकडेच स्टार प्रवाह वाहिनीने नव्या कोऱ्या आठ मालिकांची घोषणा केली आहे. यात ‘मराठी मिडीयम ‘ (Marathi Medium) या मालिकेच्या नायिकेची सध्या प्रचंड चर्चा आहे. चिन्मय मांडलेकर(Chinmay Mandlekar) आणि मंदार देवस्थळी (Mandar Devasthali) या सुपरहिट दिग्दर्शक जोडीची ही मालिका लवकरच छोटा पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. पण चर्चा आहे ती या मालिकेतील नव्या चेहऱ्याची. या मालिकेत रील स्टार श्रद्धा पवार (Shraddha Pawar) प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. सोशल मीडियावर रील बनवणाऱ्या 24 वर्षांच्या या रील स्टारला एका सुपरहिट गाणे थेट मालिकेत प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली. 

तिच्या एक गाणं सोशल मीडियावर प्रचंड गाजलं . हजारो लोकांनी अक्षरशः हे गाणं डोक्यावर घेतलं होतं. तशी अनेक छोट्या छोट्या भूमिका करत तिने अभिनय क्षेत्रात आपली चुणूक दाखवली. पण अडीच वर्षांनी तिलाही संधी मिळाली. आता अभिनेत्री श्रद्धा पवार स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकेत आपल्या अभिनयाची छाप सोडण्यासाठी तयार आहे.

कोण आहे अभिनेत्री श्रद्धा पवार ?

स्टार प्रवाहवर लवकरच सुरू होणाऱ्या मराठी मिडियम मालिकेची घोषणा होताच चर्चा रंगली ती मालिकेच्या मुख्य नायिकेची. सुप्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर श्रद्धा पवार या मालिकेत मुख्य नायिकेच्या भूमिकेत झळकणार आहे. श्रद्धाचा हा प्रवास अतिशय प्रेरणादायी आणि संघर्षमय राहिला आहे. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या श्रद्धाने शालेय जीवनात विविध एकांकिका आणि नाट्यस्पर्धांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली. त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने आपली कला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केली. तिच्या अभिनयाला आणि व्यक्तिमत्त्वाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत गेला.  ‘तिच्या माझी बाय गो’ या गाण्याने तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. 

गेल्या चार वर्षांत श्रद्धाने अनेक मालिकांमधून छोट्या-मोठ्या भूमिका साकारत अभिनय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली. मुख्य अभिनेत्री बनण्याचं स्वप्न मनात बाळगून ती सातत्याने मेहनत घेत राहिली. अखेर अडीच वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर तिला मराठी मिडियम मालिकेच्या ऑडिशनसाठी संधी मिळाली. चार टप्प्यांच्या ऑडिशन प्रक्रियेनंतर श्रद्धाची या भूमिकेसाठी निवड झाली आणि खऱ्या अर्थाने मेहनतीचं फळ तिला मिळालं. मराठी मिडियम मालिकेत श्रद्धा सरस्वती खेडेकर ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. मराठी शाळेच्या अस्तित्वासाठी झटणारी, आपल्या संस्कृतीचा आणि मातृभाषेचा अभिमान बाळगणारी सरस्वती ही भूमिका श्रद्धासाठी एक मोठं आव्हान आणि तितकीच महत्त्वाची संधी ठरणार आहे.

 

आणखी वाचा





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *