Shiv Yog 2026 : जून महिन्याच्या शेवटी जुळून येणार ‘शिव योग’; 24 जूनपासून ‘या’ 3 राशी राहतील टेन्शन फ्री, भगवान शंकराची असेल विशेष कृपा


Shiv Yog 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जून महिन्याचा अर्धा महिना जवळपास संपत आला आहे. आता जून (June 2026) महिन्याचा शेवटचा आठवडा फार शुभ आणि कल्याणकारी ठरणार आहे. ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने हा एक शुभ संयोग मानण्यात आला आहे. ज्योतिष शास्त्रात याला शिव योग (Shiv Yog) मानतात. हा भगवान शंकराची कृपा आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानला जातो. मान्यतेनुसार, या योगाच्या दरम्यान केलेले शुभ काम, पूजा पाठ, दानधर्म केल्यास विशेष फळ प्राप्त होतं. 

त्यानुसार, यंदा हा शिव योग 24 जून 2026 सकाळी 10 वाजून 23 मिनिटांनी सुरु होणार आहे. तर, 25 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजून 54 मिनिटांपर्यंत हा शुभ योग असणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार हा योग कोणकोणत्या राशींसाठी भाग्यशाली ठरतो ते जाणून घेऊयात. 

शिव योग म्हणजे काय?

ज्योतिष शास्त्रानुसार, जुळून येणारा शुभ योग हा फार खास आणि महत्त्वाचा मानला जाणार आहे. हा योग सूर्य आणि चंद्राची विशेष स्थिती तसेच, शुभ ग्रहांच्या प्रभावाने जुळून येतो. शिव योग हा सौभाग्य, मानसिक शांती, यश आणि अध्यात्मिक प्रगतीचा कारक ग्रह मानतात. असं म्हणतात की, या योगाच्या दरम्यान व्यक्तीच्या जीवनात सुरु असलेल्या अडचणी की होतात. धार्मिक मान्यतेनुसार, शिव योगाच्या दरम्यान भगवान शंकराची पूजा केल्याने विशेष कृपा मिळते. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी शिव योग हा शुभ संकेत घेऊन येणारा असणार आहे. या काळात तुमची रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येऊ शकतात. नोकरदार वर्गातील लोकांवर कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. तसेच, तुम्हाला नोकरीत प्रमोशन देखील मिळू शकतं. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शिव योग हा आर्थिक वृद्धीचा असणार आहे. या काळात तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, करिअरमध्ये प्रगतीचे संकेत आहेत. या काळात केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही घेतलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळेल. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभकारक असणार आहे. या काळात तुम्हाला करिअरशी संबंधित अनेक गोष्टींचा लाभ घेता येईल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, घरातील वातावरण सकारात्मक असणार आहे. तुम्हाला एखादी शुभवार्ता मिळू शकते. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हे ही वाचा : 

Mangal Nakshatra Parivartan 2026 : अवघ्या 24 तासांत मंगळ ग्रहाचं संक्रमण; 16 जूनपासून ‘या’ 4 राशींची पाचही बोटं तुपात, बॅंक बॅलेन्समध्ये होणार दुप्पट वाढ



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *