Krushnaichya Leki Serial: प्रेक्षकांना नेहमीच काहीतरी वेगळं, नाविन्यपूर्ण मनाला स्पर्श करून देणारी आणि भावनांना वाट मोकळी करून देणारी झी मराठी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नव्या कल्पना, नवे प्रयोग आणि अविस्मरणीय क्षण यासाठी ओळखली जाणारी ही वाहिनी यावेळी ‘कृष्णाईच्या लेकी’ या मालिकेच्या निमित्ताने केवळ एक आगळावेगळा उपक्रम सादर केला नाही, तर प्रेम, माया आणि आपुलकीचा असा क्षण निर्माण केला ज्याने संपूर्ण महाराष्ट्राची मनं जिंकून घेतली.
‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेच्या प्रमोशनसाठी झी मराठीने एक अनोखा आणि हृदयस्पर्शी उपक्रम राबवत महाराष्ट्राचा लाडका इन्फ्लुएन्सर ‘नंदन कुंटे’ याच्यासोबत खास सहयोग साधला. नंदन हे नाव आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी परिचित आहे. त्याचा निरागस स्वभाव, मनमोकळेपणा आणि “आईच्या हातचं माझ्या आवडीचं” हा त्याचा गाजलेला संवाद घराघरात पोहोचला आहे. त्याच प्रेमळ भावनेला साजेसा असा विशेष व्हिडिओ ‘कृष्णाईच्या लेकी’ या मालिकेसाठी तयार करण्यात आला. या शूटिंगदरम्यान नंदनसोबत काम करण्याचा अनुभव संपूर्ण टीमसाठी अत्यंत सुखद आणि संस्मरणीय ठरला. त्याच्या सहज वागण्याने आणि सकारात्मक ऊर्जेने सेटवरील वातावरण आणखी आनंददायी बनले. मालिकेतील आई-मुलीच्या नात्याची भावना आणि नंदनचा आईविषयीचा जिव्हाळा यामुळे हा व्हिडिओ अधिकच जवळचा वाटला.
तासाभरत 1200 हून अधिक कमेंट्सद आणि 17k शेअर
सोशल मीडियावर ही विशेष रील अपलोड होताच प्रेक्षकांकडून त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. काही क्षणांतच रील व्हायरल झाली आणि अवघ्या एका तासाच्या आत 1200 हून अधिक कमेंट्सद्वारे आणि 17k शेअरद्वारे प्रेक्षकांनी आपले प्रेम व्यक्त केले. अनेकांनी नंदनच्या निरागसतेचे कौतुक करत मालिकेबद्दलची उत्सुकता देखील व्यक्त केली. ‘कृष्णाईच्या लेकी’ ही मालिका नात्यांमधील जिव्हाळा, संघर्ष आणि प्रेमाची सुंदर कहाणी प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहे. या मालिकेच्या प्रवासाची सुरुवात नंदन सारख्या लाडक्या व्यक्तिमत्त्वासोबत झाल्याने टीम अत्यंत आनंदात आहे. झी मराठीचा हा विशेष उपक्रम प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करून गेला असून ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेला मिळालेल्या या प्रेमळ प्रतिसादामुळे संपूर्ण टीम उत्साहित झाली आहे.तेव्हा पाहायला विसरू नका ‘कृष्णाईच्या लेकी’ १५ जूनपासून दररोज संध्या ७ वा. सदैव तुमच्या झी मराठीवर.
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष