Last Updated:
आपल्या हाताची पाचही बोटे वेगवेगळ्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे हाताचे कोणते बोट लांब आहे आणि कोणते लहान, यावर त्या व्यक्तीचे भाग्य अवलंबून असते.
Finger Lenght Secrets : सामुद्रिक शास्त्रामध्ये मानवी शरीराची ठेवण, हाता-पायांच्या रेषा आणि बोटांच्या आकारावरून व्यक्तीचे भविष्य, तिचा स्वभाव आणि आर्थिक स्थितीचा अचूक अंदाज लावला जातो. आपल्या हाताची पाचही बोटे वेगवेगळ्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे हाताचे कोणते बोट लांब आहे आणि कोणते लहान, यावर त्या व्यक्तीचे भाग्य अवलंबून असते. सामुद्रिक शास्त्रानुसार, व्यक्तीच्या शरीराचा आकार त्याच्या जीवनाशी संबंधित रहस्ये उलगडतो. व्यक्तीच्या बोटांच्या लांबीलाही विशेष महत्त्व आहे. सामुद्रिक शास्त्राच्या मदतीने जाणून घेऊया की कोणती बोटे लांब किंवा लहान असणे शुभ मानले जाते.
मधले बोट इतर बोटांपेक्षा लहान असणे अशुभ मानले जाते. सामुद्रिक शास्त्रानुसार, असे लोक स्वार्थी असतात आणि स्वतःच्या फायद्यासाठी कोणालाही इजा पोहोचवू शकतात. यामुळेच ते जास्त मित्र बनवत नाहीत, तसेच ते त्यांच्या प्रेम जीवनातही समाधानी नसतात. अशा लोकांना आयुष्यात अनेकदा विश्वासघाताचा सामना करावा लागतो.
सामुद्रिक शास्त्रानुसार, ज्या लोकांचे अनामिका बोट सर्वात लांब असते, त्यांचा स्वभाव मनमिळाऊ असतो. असे लोक केवळ स्वतःच्या हिताचा विचार करत नाहीत, तर ते इतरांना मदत करण्यास नेहमी तयार असतात. शिवाय, त्यांच्या आयुष्यात यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते.
इतर बोटांपेक्षा मधले बोट लांब असणे अशुभ मानले जाते. सामुद्रिक शास्त्रानुसार, अशा लोकांना जीवनात विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांना कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही. त्यांच्या आयुष्यात प्रेमसुद्धा उशिरा येते.
तर्जनी आणि मधले बोट समान असणे शुभ मानले जाते. सामुद्रिक शास्त्रानुसार, असे लोक मेहनती असतात आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्नशील असतात. समाजात त्यांना आदरणीय व्यक्ती म्हणूनही ओळखले जाते.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Mumbai,Maharashtra
हाताच्या कोणत्या बोटाचं लांब किंवा लहान असणं असत अशुभ? तुमची बोटं उलगडतात स्वभाव आणि नशिबाची रहस्य!
