Shiv Sena: आगामी 2029 च्या लोकसभा (Lok Sabha Election 2029) आणि विधानसभा निवडणुका (Vidhan Sabha Election 2026) अजून दूर असल्या तरी शिवसेना (Shiv Sena) पक्षाने आतापासूनच अत्यंत आक्रमक आणि नियोजनबद्ध पद्धतीने तयारी सुरू केली आहे. आगामी निवडणुकांमध्ये पक्षाचे जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी कशा प्रकारे निवडून येतील, यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची रणनीती आखली जात आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाने राज्यातील 200 हून अधिक विधानसभा मतदारसंघांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे.
Shiv Sena: स्थानिक पातळीवर संघटना बळकटीवर भर
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील 200 हून अधिक विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे वरिष्ठ नेते स्थानिक पातळीवर ‘बुथ लेव्हल एजंट’ (BLA) नोंदणी अभियान आणि मतदारसंघ आढावा दौरा करणार आहेत. निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी बुथ पातळीवरील यंत्रणा मजबूत करणे आवश्यक असल्याने या अभियानाला पक्षातर्फे मोठे महत्त्व दिले जात आहे.
Shiv Sena: श्रीकांत शिंदे आणि उदय सामंत यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी
या महाअभियानाची संपूर्ण जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत आणि लोकसभेचे गट नेते खासदार डॅाक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर प्रत्येकी 100 विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. हे दोन्ही नेते आपापल्या जबाबदारीच्या मतदारसंघात जाऊन थेट तळागाळातील कार्यकर्त्यांशी आणि मतदारांशी संवाद साधणार आहेत.
Shiv Sena: पुढील तीन दिवस दौऱ्यांची रणधुमाळी
पक्षाच्या या मोहिमेची सुरुवात झाली असून, खासदार डॅाक्टर श्रीकांत शिंदे यांचा उत्तर महाराष्ट्र दौरा सुरू झाला आहे. उत्तर महाराष्ट्रातील संघटनात्मक आढावा घेतल्यानंतर पुढील रणनीती ठरवली जाईल. दुसरीकडे, डॅाक्टर श्रीकांत शिंदेंचा दौरा सुरू होताच, उद्योग मंत्री उदय सामंत हे देखील मैदानात उतरत आहेत. उदय सामंत हे पुढील तीन दिवस मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघांचा झंझावाती दौरा करणार आहेत. त्यामुळे आता उदय सामंत यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Shrikant Shinde: नाशिक दौऱ्यात श्रीकांत शिंदेंचा स्थानिक नेत्यांना इशारा
दरम्यान, नाशिकच्या चांदवड आणि निफाड विधानसभा मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसंवाद दौऱ्यादरम्यान पक्ष संघटनेचा आढावा घेत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी गंभीर असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. स्थानिक नेत्यांना पक्ष मजबूत करण्याच्या सक्त सूचना देत, केवळ शिफारशीवर उमेदवारी मिळणार नसून कामगिरीच्या आधारावर निर्णय होईल, असा स्पष्ट इशारा शिंदे यांनी दिला. बैठकीतील निरीक्षणे थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
आणखी वाचा