Sharad Pawar Party : शरद पवारांचा पक्ष फूटणार का? आमदार, खासदार…देवेंद्र फडणवीसांनी A टू Z सांगून टाकलं; सस्पेन्स संपला! – Marathi News | Cm devendra fadnavis told no sharad pawar party will join nda in maharashtra


Devendra Fadnavis : राज्याच्या राजकारणात सध्या वेगळेच वारे वाहू लागले आहेत. कधी काय होईल, हे सांगणे कठीण होऊन बसले आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे यांच्या पक्षात मोठी फूट पडली. सहा खासदारांनी तसेच सचिन अहिर या आमदारांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पक्षात प्रवेश केला. ठाकरे यांच्या पक्षात फूट पडल्यानंतर आता खासदार शरद पवार यांच्याही पक्षात फूट पडणार असल्याचा दावा केला जातोय. लवकरच शरद पवार यांचा पक्ष एनडीएत सामील होण्याचीही शक्यता काहीजण व्यक्त करत आहेत. दरम्यान, आता याच चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी शरद पवार यांचा पक्ष एनडीएसोबत येणार की नाही, हे थेट सांगून टाकलं आहे.

शरद पवार यांचा पक्ष एनडीएसोबत येणार नाही

देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर होते. आपल्या या दौऱ्यादरम्यान फडणवीस यांनी काही राजकीय भेटीदेखील घेतल्याचे बोलले जात आहे. या दिल्ली दौऱ्यादरम्यान फडणवीस यांना शरद पवार यांच्या पक्षाबाबत विचारणा करण्यात आली. यावर बोलताना शरद पवार यांचा पक्ष एनडीएसोबत येणार नाही. ही एक पेरलेली बातमी आहे. यात कुठलेही तथ्य नाही. महाराष्ट्रात एनडीएत कोणताही नवा पक्ष येणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.

पवार यांचे आमदार किंवा खासदारही…

तसेच महाराष्ट्रातून एनडीएत कोणताही नवा पक्ष येणार नाही. आम्ही आमच्यासोबत कोणालाही जोडणार नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच पवार यांचे आमदार किंवा खासदारही भविष्यात आम्ही फोडणार नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.

रोहित पवार यांनी काय माहिती दिली?

दरम्यान, शरद पवार यांचा पक्ष थेट एनडीएत सहभागी होऊ शकते, असा दावा केला जातोय. तर काहीजण एनडीएला बाहेरून पाठिंबा दिला जाऊ शकतो, असेही दावे केले जातायत. याच दाव्यांवर शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिले आहे. आम्ही एनडीएला पाठिंबा देणार नाही, असे रोहित पवार म्हणाले आहेत. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *