September Horoscope 2026: सप्टेंबर महिन्याचे 15 दिवस उलटून गेले आहेत. आता 16 ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंत असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, सप्टेंबरच्या शेवटच्या 15 दिवसांचा काळ अनेकांचे नशीब पालटणारा ठरणार आहे. ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींमुळे काही राशींसाठी हा आठवडा भाग्याचा ठरेल, तर काहींना आव्हानात्मक ठरेल. त्यामुळे हा काळ कोणत्या राशींसाठी कशाप्रकारे बदल घेऊन येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बऱ्याच ज्योतिषप्रेमींना उत्सुकता आहे की, सप्टेंबर महिन्याचे शेवटचे 15 दिवस कसे जाणार? आज आपण मेष ते कन्या अशा सहा राशींचं राशीभविष्य जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीसाठी 16 ते 30 सप्टेंबरचा काळ कामाच्या दृष्टीने सक्रिय राहू शकतो. सुरुवातीला काही प्रलंबित कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा लागेल. नोकरीत जबाबदारी वाढण्याची शक्यता असून तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. व्यवसायात नवीन ग्राहक किंवा व्यवहार मिळू शकतात, मात्र आर्थिक निर्णय घाईने घेऊ नका. या काळात खर्च वाढण्याची शक्यता असल्याने पैशांचे नियोजन महत्त्वाचे ठरेल. कुटुंबातील वातावरण साधारण चांगले राहील. प्रेमसंबंधात गैरसमज निर्माण झाल्यास शांतपणे संवाद साधणे फायदेशीर ठरेल. महिन्याच्या शेवटच्या दिवसांत एखादे महत्त्वाचे काम मार्गी लागण्याची शक्यता आहे.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीसाठी 16 ते 30 सप्टेंबरचा काळ संवाद आणि संपर्क महत्त्वाचे ठरतील. नोकरीमध्ये नवीन जबाबदारी किंवा कामाची पद्धत बदलण्याची शक्यता आहे. तुमच्या बोलण्यामुळे एखादी संधी मिळू शकते. व्यवसायात नवीन लोकांशी संपर्क वाढेल आणि त्यातून भविष्यात फायदा होऊ शकतो. आर्थिक बाबतीत उत्पन्नाबरोबरच खर्चही वाढू शकतो, त्यामुळे नियोजन आवश्यक आहे. कुटुंबात एखाद्या विषयावर चर्चा होईल. प्रेमसंबंधात मोकळेपणाने बोलल्यास जवळीक वाढेल..
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीसाठी 16 ते 30 सप्टेंबरचा काळ गणेशोत्सव संवादाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. तुमचा हेतू चांगला असला तरी तुमच्या एखाद्या बोलण्याचा किंवा संदेशाचा चुकीचा अर्थ घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे विशेषतः कौटुंबिक चर्चेत शब्द जपून वापरणे गरजेचे आहे. WhatsApp किंवा फोनवरील चर्चेमुळे गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असल्याने महत्त्वाच्या विषयांवर प्रत्यक्ष संवाद साधणे अधिक चांगले राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या नवीन कल्पनांना चांगला प्रतिसाद मिळू शकतो. मात्र एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या स्वीकारल्याने मानसिक थकवा जाणवू शकतो.
कर्क रास (Virgo Horoscope)
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी 16 ते 30 सप्टेंबरचा काळ भावनिक आणि कौटुंबिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरू शकतो. घरातील एखाद्या विषयामुळे सुरुवातीला चिंता वाटेल, परंतु परिस्थिती हळूहळू सुधारेल. नोकरीत कामाचा ताण वाढू शकतो, मात्र मेहनतीचे परिणाम मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात व्यवहार करताना कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा. पैशांच्या बाबतीत अनपेक्षित खर्च होऊ शकतो. जवळच्या व्यक्तीची मदत मिळाल्याने मनाला आधार मिळेल. प्रेमसंबंधात जुना गैरसमज दूर करण्याची संधी मिळू शकते.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीसाठी 16 ते 30 सप्टेंबरचा काळ आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. वरिष्ठांकडून कौतुक किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी योग्य वेळ मिळेल. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता असली तरी प्रतिष्ठेसाठी अनावश्यक खर्च टाळणे चांगले. कुटुंबातील व्यक्तींकडून सहकार्य मिळेल. प्रेमसंबंधात उत्साह राहील आणि एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्याची चर्चा होऊ शकते. महिन्याच्या शेवटी कामाचा ताण कमी होऊन मानसिक समाधान मिळेल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीसाठी 16 ते 30 सप्टेंबरचा काळ नियोजनबद्ध कामाचा फायदा होईल. नोकरीमध्ये बारकाईने केलेले काम वरिष्ठांच्या लक्षात येऊ शकते. एखाद्या जुन्या प्रकल्पाला पुन्हा सुरुवात होण्याची शक्यता आहे. व्यवसायात लहानसहान अडचणी येतील, पण त्या योग्य नियोजनाने सोडवता येतील. आर्थिक बाबतीत बचतीवर भर देणे योग्य राहील. कुटुंबातील वातावरण चांगले राहण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात अपेक्षा स्पष्टपणे व्यक्त केल्यास नाते अधिक मजबूत होईल. आरोग्याच्या बाबतीत पचन आणि तणावाशी संबंधित त्रासांकडे लक्ष द्या..
हेही वाचा :
Horoscope Today 16 September 2026: आजचा बुधवार 7 राशींसाठी भाग्याचा! अनेक शुभ योग जुळले, कोण भाग्यशाली? पैसा, नोकरी, प्रेम.. आजचे राशीभविष्य
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)