Sara Tendulkar Ganeshotsav: आपल्या देशात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव (Ganeshotsav) साजरा करण्यात येत आहे. गणेशोत्सव म्हटलं की, मोदक (Modak), सजावट आणि गणपती बाप्पांची आराधना आलीच. सामान्य लोक ते प्रतिष्ठित आणि प्रसिद्धी लोकही हा सण अगदी उत्साहात साजरी करतात. मास्टर ब्लास्टर माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांनीही आपल्या घरात गणपती बाप्पांचे स्वागत केले आहे. तसेच आपल्या चाहत्यांनाही गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सचिन तेंडुलकर यांच्या घरात सध्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वांनी उत्साहात या आनंदात सहभाग घेतला आहे. सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर हिने देखील गणेशोत्सवाच्या उत्सवात सहभागी झाली आहे. तिचे सोशल मीडियावर फोटोस व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे साराने वहिनी सानिया चंडोकसोबत पोज दिले आहेत.
सारा तेंडुलकरचा खास गणेशोत्सव लूक सोशल मीडियात व्हायरल (Sara Tendulkar Celebrates Ganeshotsav With Family Poses)
सारा तेंडुलकरने मंगळवारी आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर गणेशोत्सवानिमित्त काही फोटोस आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये वडील सचिन तेंडुलकर हे घरात गणपती बाप्पांसमोर आरती करत असल्याचं दिसत आहे. साराने पोस्ट शेअर करत म्हटलं की, ‘मोदक, आरती, चमचमीत जेवण, कुटुंब, मित्र परिवार आणि गणपती बाप्पा. या सर्वांचेच एकत्र येण्याने चांगली भावना निर्माण होते. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा’. असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
साराने खास आपला गणेशोत्सवानिमित्त कॅरी केलेला लूक देखील सोशल मीडियात शेअर केला आहे. या लूकमध्ये सारा तेंडुलकर प्रचंड सुंदर दिसत आहे. साराने आपल्या मनमोहक आणि सुंदर फोटोस शेअर करुन, या फोटोंना लक्षवेधी कॅप्शनही दिलं आहे. साराने आपल्या सुंदर साडीतील फोटोस शेअर करुन, ‘Ganpu season’ असं कॅप्शन दिलं आहे. साराने खास साडी नेसली आहे. पहिल्या फोटोमध्ये साराने स्माईल देत पोज दिली आहे. दुसऱ्या फोटोमध्ये साराने कॅमेऱ्यासमोर विविध पोज दिल्या आहेत. तिसऱ्या फोटोमध्ये तिने कॅमेऱ्यासमोर सरळ उभं राहून पोज दिले आहे. यात तिची साडी खूप सुंदर दिसत आहे.
तर, चौथ्या फोटोमध्ये साराने गणपती बाप्पांच्या फोटोसमोर हात जोडून उभी आहे. गणपती बाप्पांची तेजस्वी मुर्ती अगदी लक्षवेधी ठरत आहे. पाचव्या फोटोमध्ये साराने वहिनी सानिया चंडोकसोबत पोज दिले आहेत. नणंद वहिनीची जोडी एकत्र खूप सुंदर दिसत आहे. साराच्या गणपती लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. साराने साडीसह हेवी ज्वेलरी कॅरी केली आहे. कानात झुमके आणि बांगड्याही तिने घातल्या आहेत. तर, केसातही साराने गजरा माळला आहे. यामुळे साराच्या सौंदर्यात भर पडली आहे. सारा या लूकमध्ये खूप सुंदर दिसत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या: