Sanjay Shirsat : महायुतीत विधान परिषद जागांचा तिढा कधीपर्यंत सुटेल? संजय शिरसाट यांनी तो टायमिंग सांगितला – Marathi News | Eknath Shinde Shivsena Minister Sanjay Shirsat Spoke about local body vidhan parishad election slam Sanjay raut


“विधान परिषदेच्या 17 जागा आहेत. आपल्याला जागा मिळाली पाहिजे असं प्रत्येकाला वाटत आहे. तिढा खूप मोठा आहे असं नाही. आज संध्याकाळपर्यंत तिढा सुटलेला असेल. आम्हाला कोणत्या जागा मिळाल्या याबाबत आतापर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही. तीनही पक्षाचे नेते घोषणा करत नाहीत, तो पर्यंत चर्चेला अर्थ नाही. आम्हाला कोणत्या जागा मिळणार यावर शिंदे बोलत आहेत. त्यामुळे शिंदे बोलत असतील त्यावर आम्ही बोलणे योग्य नाही” असं शिवसेना नेते संजय शिरसाट म्हणाले. ते राज्य सरकारमध्ये मंत्री आहेत. “दिल्लीत तळ ठोकण्याची कारणं वेगळी आहेत. कांदा प्रश्न, जागावाटप इतर मुद्दे आहेत. दिल्लीत कोणत्या विषयावर चर्चा झाली, यावर मी बोलणार नाही” असं संजय शिरसाट म्हणाले.

“30 तारखेला उपोषणाला बसणार अशी मनोज जरांगे यांनी घोषणा केली आहे. प्रसाद लाड त्यांना आज भेटायला जाणार आहेत. सरकार त्यांच्या मागण्यांचा विचार करत आहे. मनोज जरांगे काय निर्णय घेतात हे लवकरच कळेल. सरकार काय निर्णय घेतं यावर लवकर घोषणा होईल” असं शिरसाट म्हणाले. “उपोषणाचा रोख योग्य आहे. सरकार भूमिका मांडणार आहे. आता सरकार आणि जरांगे यांच्यात काय चर्चा सुरू आहे, याचा तपशील आमच्याकडे नाही” असं संजय शिरसाट म्हणाले.

इंग्रज गेले आणि काँग्रेसी आले

“जाती जातीत तेढ निर्माण करण्याचं काम काँग्रेसने केले आहे. इंग्रज गेले आणि काँग्रेसी आले. जातींना एकसंघ होऊ दिले नाही.आपसात भांडणं लावून सत्ता मिळवण्याचं तंत्र काँग्रेसला माहीत आहे” असं संजय शिरसाट म्हणाले. “फडणवीस यांना सगळेच ओळखतात. त्यामुळे त्यांचे मित्र शत्रू त्यांन माहीत आहेत. आमचा जिथे जीव गुदमरत होता, तिथून आम्ही कसं बाहेर पडलो संजय राऊतला माहित आहे. संजय राऊत यांचा जीव कुठे आहे तुम्हालाच माहित नाही. राऊत यांचा जीव न उद्धव ठाकरे आहे ना शरद पवार कडे आहे” अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.

यांच्याकडे कार्यकर्त्यांना सांभाळण्याची दानत सुद्धा नाही

“संजय राऊतांनी दुसऱ्यांनी काय केलं, यापेक्षा स्वतःच्या कर्तृत्वाकडे डोकावून बघा ना, तुमच्या गुणांमुळे तुमचं सरकार गेलं आहे. उद्या निवडणुका लागल्या तर आता उद्धव ठाकरे यांचा चेहरा घेऊन निवडणूक लढवणार अस म्हणतील यांना पक्षाशी काही घेण देणं नाही. यांच्याकडे कार्यकर्त्यांना सांभाळण्याची दानत सुद्धा नाहीये” असं शिरसाट म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *