Ashish Shelar : प्रभू राम चंद्रांनी स्वतःच्या भावाला सत्ता दिली आणि उद्धव ठाकरे यांनी..आशिष शेलारांचा मनाला लागेल असा वार – Marathi News | Minister And bjp leader Ashish Shelar slam uddhav Thackeray over Nagpur ram Raksha andolan


उद्धव ठाकरे आज नागपूरात आहेत. तिथे ते रामरक्षा आंदोलन करणार आहेत. त्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे. “राम मंदिर तिजोरीत झालेला अपहर यावर आंदोलन असेल तर उत्तर प्रदेश सरकारने यात ज्यांचा हात आहे, त्यांच्या चौकशीसाठी SIT नेमली आहे. यात अटक देखील झाली आहे. काही व्यक्तींनी राजीनामा देखील दिलाय. उत्तर प्रदेश सरकारने कोणालाही पाठीशी घातलेलं नाही” असं आशिष शेलार म्हणाले. “राजकारण यात आहे की नाही समजून घेतलं पाहिजे. आज उबाठा सेना जे आंदोलन करत आहे, राम भक्ती यावर बोलण्याअगोदर हिंदू समाजाची माफी मागावी लागेल. प्रभू राम यांचं अस्तित्व ज्यांनी नाकारलं, त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलात. हे आंदोलन तोंड देखले पणाचं आहे. या आंदोलनामागे षडयंत्र आहे असं माझं मत आहे. त्या मंडळींना बरं वाटव म्हणून उद्धव जी आंदोलन करत आहेत का?” असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला.

उद्धव ठाकरे शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याच्या विषयावर म्हणाले की, “दोन भावांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. दोन पक्षांनी एकत्र यावं की न यावं हा उबाठा आणि मनसेचा प्रश्न आहे. विषय रामाचा असल्याने राम रक्षा घेत आहेत पण प्रभू राम चंद्र यांनी स्वतःच्या भावाला सत्ता दिली आणि उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना कसा त्रास दिलाय आपण बघितलंय”

संजय राऊत बालिश आहेत

संजय राऊत यांनी सोनम वांगचूक यांच्या आंदोलनावर कारवाई झाली, त्यावरुन सरकारवर टीका केली. त्यावर आशिष शेलार यांनी उत्तर दिलं. “संजय राऊत बालिश आहेत. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशनुसार काम करण्यात आलंय. पोलीस कारवाई संवेदनशील आहे. त्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न संजय राऊत करत आहेत” असं शेलार म्हणाले.

आंदोलन करण्याचा हक्क सर्वांनाच

“आंदोलन करण्याचा हक्क सर्वांनाच आहे. आंदोलन करणाऱ्यांच्या मागणी बाबत बोलायचं झाल्यास नीटच्या परीक्षेबद्दलची गडबड पोलिसांनी त्यावर कारवाई केली. आरोपीना अटक झाली. यात कोणालाही सरकारने पाठीशी घातलं नाही. व्यक्तिशः कोणाचा हातभार आहे असं ही नाहीय. चौकशी, अटक आणि त्यावरच उत्तर शोधल्यावर नीटची परीक्षा झाली” असं आशिष शेलार म्हणाले.
जयंत पाटील

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरही बोलले

“महाविकास आघाडी एकत्र नाही यात तथ्य आहे राम रक्षा आंदोलनात काँग्रेस सहभागी नाही. संजय राऊत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रण देतात पण नाना पटोले यांना बोलवत नाहीत” याकडे आशिष शेलार यांनी लक्ष वेधलं. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर म्हणाले की, चर्चांवर उत्तर काय देऊ, दोघांनी चर्चा करावी मग ठरेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *