Sangli Wrestling Competition: 3 लाखांची कुस्ती 30 सेकंदात निकाली; सांगलीतील बलवडीमध्ये महिलांच्या कुस्तीत नेमकं काय घडलं?


Sangli Wrestling Competition: सांगलीमधील खानापूर तालुक्यातील बलवडीमध्ये महिलांच्या कुस्तीची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये प्रथम क्रमांकाची 3 लाखांच्या कुस्तीचा 30 सेकंदात निकाल लागला. हरियाणाच्या सोनम मलिकने दिल्लीच्या वेदिका सासणेला चितपट केले. (Sangli Wrestling News)

नेमकं काय घडलं? (Sangli Wrestling Competition)

खानापूर तालुक्यातील बलवडीमध्ये भवानी देवीच्या यात्रेनिमित्त भवानी स्पोर्ट्स क्लबकडून महिलांच्या कुस्तीचे खास मैदान आयोजित करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या अनेक महिला कुस्तीपटूनी या कुस्ती मैदानात हजेरी लावली. या मैदानात दिल्लीची राष्ट्रीय पदक विजेती पैलवान वेदिका सासणे विरुद्ध हरियाणाची वर्ल्ड चॅम्पियन पैलवान सोनम मलिक यांच्यात 3 लाखांची प्रथम क्रमांकाची कुस्ती पार पडली. 3 तीन लाखाची पहिल्या क्रमांकाची ही कुस्ती अवघ्या 30 सेकंदामध्ये हरियाणाच्या सोनम मलिकने दुहेरी पटातून एकेरी पट काढत वेदिका सासणेला चितपट करत जिंकली. डोळ्याची पापणी लवते न लवते तोवर ही कुस्ती निकाली निघाली. तर दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती ही सृष्टी भोसले विरुद्ध रितिका हुड्डा आणि प्रतिक्षा बागडी विरुद्ध खुशी दलाल यांच्यात 2लाख 75 हजाराची तर धनश्री फंड विरुद्ध मुस्कान नांदल यांच्या 2 लाख 51 हजाराची कुस्ती पार पडली.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *