Amol Kolhe Announcement On Mi Savitribai Jyotirao Phule Serial: गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेते डॉ अमोल कोल्हे (Amol Kolhe) चर्चेत आहेत, स्टार प्रवाहच्या ‘ मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले’ (Mi Savitribai Jyotirao Phule) मालिकेमुळे. TRPचं कारण देत ही मालिका बंद करण्याचा निर्णय स्टार प्रवाह वाहिनीने घेतला. यामुळे मनोरंजनसृष्टीत प्रेक्षकांसह अनेकांना मोठा धक्का बसला होता. या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारे अभिनेते डॉ अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी मालिका वाचवण्याचा अनेक प्रयत्न केले.मात्र, आता ज्या आठवड्यात ही मालिका संपली त्याच आठवड्यात ही मालिका सुरु करणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी केलीय. ‘मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले’ ही मालिका 20 जून पासून सुरु होणार आहे. मालिका कुठे पाहायला मिळणार, कुठे सुरु होणार , या सगळ्याविषयी ते बोलले आहेत.
काय म्हणाले अमोल कोल्हे?
“तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे शिवधनुष्य उचलतोय. ही मालिका बंद झाली, तेंव्हा अनेकांनी खंत व्यक्त केली. सोशल मिडीयावर व्हिडीओज पोस्ट केले होते. या तुमच्या पाठिंब्यामुळे एक अचाट धाडस करू पाहतो आहे. शिवधनुष्य उचलू पाहतोय. मला खात्री आहे, महाराष्ट्राचा DNA रडणारा नाही लढणारा आहे.” असं ते म्हणले. 20 जूनपासून मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले मालिका सुरु होतेय. 20 जूनला संध्याकाळी सहा वाजता या मालिकेचा प्रीमियर होईल. ही मालिका ‘ मराठी वारसा’ या youtube channel ला सुरु होणार आहे. मराठी मनोरंजन विश्वाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडतंय. मनोरंजन विश्वातला हा आपण पहिला प्रयोग करून पहतोय. हा आपला इतिहास आहे, हा आपलं अभिमान आहे. तो त्याच दिमाखात लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. त्यामुळे नव्या ढंगात आणखी दिमाखात ‘ सावित्रीबाई ज्योतीराव फुले’ मालिका सुरु होते आहे. आठवड्यातून 2 दिवस, दर बुधवार आणि शनिवारी मालिकेचे नवे एपिसोड तुम्हाला पाहता येतील. तुमचं प्रेम पाठींबा आणि जी खदखद होती की, ही मालिका आता पाहायला मिळणार नाही. पण आता जिथे मालिका संपली तिथून पुढचा संपूर्ण इतिहास, स्त्री साक्षरतेचा जो महायज्ञ आहे, हा सगळं धगधगता इतिहास तुमच्या समोर घेऊन येतोय’ असं डॉ अमोल कोल्हे म्हणाले.
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष