Nashik Crime News: आठ वर्षांचं प्रेम, लग्न ठरलं, मुलीला प्रियकरासोबत पाठवलं; पण 24 तासांतच असा काही ‘गेम’ झाला की अख्खा नाशिक जिल्हा हादरला!


Nashik Crime News: नाशिक (Nashik) जिल्ह्यातील कळवण तालुक्यात प्रेमप्रकरणातून (Love Affair) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कळवण तालुक्यातील कन्हेरवाडी (Kanherwadi) येथे 25 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मुलीसोबत लग्नाला कुटुंबीयांनी होकार दिल्यानंतर अवघ्या काही तासांतच तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी मुलीचे दोन भाऊ आणि मेव्हण्याला पोलिसांनी (Police) अटक केली असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मृत तरुणाचे नाव सचिन मोतीराम चौरे (Sachin Motiram Chaure) असे असून तो नरूळ येथील रहिवासी होता.

Nashik Crime News: आठ वर्षांचं प्रेम, पण कुटुंबीयांचा विरोध

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सचिन चौरे याचे आठंबे (Athambe) येथील एका तरुणीसोबत गेल्या आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघेही एकाच समाजातील असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्यांच्या नात्याला मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. तरुणीने सचिनसोबतच लग्न (Marriage) करण्याचा निर्धार केला होता. इतकेच नव्हे तर, कुटुंबीयांनी विरोध केल्यानंतर तिने घरात जेवणही बंद केल्याची माहिती आहे. अखेर मुलीच्या हट्टापुढे कुटुंबीयांना माघार घ्यावी लागली. मुलीचे वडील आणि मामा यांनी सचिनच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांची बैठक घेण्यात आली आणि लग्नाला तोंडी संमती देण्यात आली. यानंतर तरुणीला सचिनसोबत पाठवण्यात आले.

Nashik Crime News: लग्नाच्या चर्चेनंतर दुसऱ्याच दिवशी रक्तरंजित हल्ला

रविवारी सचिनची बहीण आणि मेव्हण्याने या दोघांना कन्हेरवाडी येथील घरी नेले होते. तोपर्यंत सर्व काही सुरळीत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, सोमवारी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास अचानक मुलीचे दोन भाऊ आणि मेव्हणा कन्हेरवाडी येथे पोहोचले. यानंतर त्यांनी सचिनवर तीक्ष्ण हत्याराने वार केले. विशेषतः छातीवर वार करण्यात आल्याने सचिन गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले.

Nashik Crime News: पळून जाणाऱ्या आरोपींना गावकऱ्यांनी पकडलं

घटनेनंतर तिन्ही आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत त्यांना पकडले. संतप्त गावकऱ्यांनी आरोपींना चांगलाच चोप दिल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनेनंतर पोलिसांनी आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात आणले. यावेळी मृत सचिनच्या संतप्त नातेवाईकांनी आरोपींवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि आरोपींना सुरक्षितपणे पोलीस ठाण्यात हलवले. या घटनेमुळे कळवण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Kalpana Kharat: अशोक खरातच्या पत्नीला मोठा दणका, कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन फेटाळला; न्यायालयाचे कडक ताशेरे, नेमकं काय घडलं?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *