Sanchita Ugale : बहीण 5.30 वाजता घराबाहेर पडली, घरी परतली तेव्हा सगळंच उद्ध्वस्त झालेलं; जीवन संपवण्यापूर्वी संचिता उगलेसोबत नेमकं काय घडलं?


Sanchita Ugale news: टीव्ही इंडस्ट्रीला हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. अभिनेत्री संचिता उगले (Sanchita Ugale) या तरुणीनं टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. वयाच्या 30 व्या वर्षी (Actress) तिनं अखेरचा श्वास घेतला. तिच्या निधनानंतर सिनेइंडस्ट्रीला (Entertainment) मोठा धक्का बसला आहे. टेलीचक्करने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेत्रीनं राहत्या घरी गळफास घेवून आयुष्य संपवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी सायंकाळी 6:30 ते 7:30 च्या दरम्यान, घडल्याची माहिती आहे.  अभिनेत्रीने नेमकी आत्महत्या का केली? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.  तिच्या कुटुंबाने कोणतीही माहिती दिलेली नाही.  

‘वागळे की दुनिया’ आणि ‘कुमकुम भाग्य’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री संचिता उगले हिने टोकाचं पाऊल उचलल्याने हळबळ व्यक्त होत आहे. नालासोपारा पूर्वेतील आचोळे गाव परिसरातील राहत्या घरी तिने आत्महत्या करत आयुष्य संपवलं. वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी तिनं या जगाचा निरोप घेतला. या घटनेची माहिती समोर येताच चाहत्यांसह मनोरंजन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. संचिता उगले ही तिचे आई-वडील आणि धाकटी बहीण अंजली यांच्यासोबत आचोळे गावातील घरात राहत होती. या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेच्या वेळी घरात संचिता एकटीच होती. तिची 15 वर्षीय धाकटी बहीण अंजली सायंकाळी सुमारास 5.30 वाजता काही कामानिमित्त घराबाहेर गेली होती.

Sanchita ugale : पंख्याला साडीच्या सहाय्यानं गळफास घेतला

घरी कोणीही नाही हे पाहून संचिता संध्याकाळी सुमारे 7 ते 7.30 वाजण्याच्या सुमारास बेडरूममध्ये गेली. बेडरूमला आतून कडी लावली आणि पंख्याला साडीच्या सहाय्यानं गळफास घेतला. काही वेळानंतर संचिताची बहीण आणि आई-वडील पुन्हा घरी आले तेव्हा सगळं उद्धवस्त झालं होतं. संचिताला तात्काळ महानगरपालिका रुग्णालयात नेण्यात आलं पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. प्राथमिक तपासात घटनास्थळावरून कोणतीही चिठ्ठी किंवा आत्महत्येचे कारण स्पष्ट करणारा पुरावा आढळून आलेला नाही.

 त्यामुळे संचिता उगले हिनं हे टोकाचं पाऊल का उचलले, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत. संचिता उगले ही छोट्या पडद्यावरील ओळखीचा चेहरा होती. ‘वागळे की दुनिया’ या लोकप्रिय मालिकेत तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. याशिवाय ‘कुमकुम भाग्य’ या हिंदी मालिकेतही तिनं काम केलं होतं. ‘छावा’ चित्रपटात तिने महाराणी ताराराणी यांची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळेही ती चर्चेत आली होती.

Who is Sanchita ugale : कोण आहे संचिता उगले ? 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  अभिनेत्री आपल्या आई- वडील आणि बहिणीसोबत नालासोपारा येथे राहत होती. घटना घडली तेव्हा अभिनेत्री घरी एकटीच होती.  पोलिसांनी सांगितले की, अभिनेत्रीनं गळफास लावून आत्महत्या केली आहे.  तिच्या मृत्यूनंतर टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री टेलिव्हिजन आणि सिनेमातून  ओळख निर्माण करत होती.  तिला खरी ओळख ‘झी टीव्ही’वरील ‘कुमकुम भाग्य’ या मालिकेमुळे मिळाली. ‘वागले की दुनिया’ या मालिकेतही तिनं काम केलं.   नंतर तिनं ‘दंगल टीव्ही’ वाहिनीवरील, ‘दिलवाली दुल्हा लै जाएगी’ या मालिकेतही महत्त्वाची भूमिका साकारली होती.  तिच्या अभिनयातून तिला टीव्ही विश्वात विशेष ओळख मिळाली. 

Sanchita ugale :  मालिकांसह सिनेमातही काम केलं 

टेलिव्हिजन जगतात काम करण्याव्यतिरिक्त, अभिनेत्रीनं सिनेमा आणि स्ट्रीमिंग प्रोजेक्ट्समध्ये काम केलं. विशेष म्हणजे तिनं विकी कौशलच्या ‘छावा’ या ऐतिहासिक सिनेमात महाराणी ‘तारा राणी’ यांच्या लहानपणीची भूमिका साकारली होती.   अभिनेत्रीनं मनोज बाजपेयी यांच्या ‘सायलेन्स 2: द नाईट आऊल बार शूटआऊट’ या सिनेमातही काम केलं. अभिनेत्री सोशल मीडियातही सक्रिय होती. संचिताचा चाहतावर्ग खूप मोठा होता. दरम्यान, अभिनेत्रीनं टोकाचं पाऊल उचलल्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 

Sanchita ugale :  शेवटचा व्हिडीओ पाहून चाहते शॉकमध्ये!

अभिनेत्रीच्या निधनाने मनोरंजन विश्वावर आणि तिच्या चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत्यूच्या अवघ्या काही तास आधीच तिने सोशल मीडियावर आपली शेवटची पोस्ट शेअर केली होती. या शेवटच्या व्हिडीओमध्ये ती प्रसिद्ध गाणं ‘डफली वाले डफली बजा’ गुणगुणताना आणि त्यावर थिरकताना दिसत होती. तिच्या निधनाची बातमी समोर येताच चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. आपल्या आवडत्या अभिनेत्रीचा अवघ्या काही तासांपूर्वीचा हसता-खेळता व्हिडीओ पाहून चाहत्यांचा तिच्या जाण्यावर विश्वासच बसत नाहीये. अनेकांनी तिच्या इन्स्टाग्रामवरील या शेवटच्या पोस्टवर कमेंट्स करत तीव्र दुःख व्यक्त केले असून तिला श्रद्धांजली वाहिली आहे. 

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *