Salman Khan Monster: ‘मॉन्स्टर’मध्ये सलमान खानचा जबरदस्त ॲक्शन धमाका; ट्रेनमध्ये होणार घमासान – Marathi News | Salman Khan’s ‘Monster’ Film : Parvez Kazi Returns For High Octane Train Fight


Salman Khan Film Monster : बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) 2027 हे आगामी वर्ष गाजवण्याच्या तयारीत आहे. गेल्या बऱ्याच काळापासूव तो दिग्दर्शक वामशी पेडिपल्ली सोबत मिळून ॲक्शन-ड्रामा फिल्मवर काम करत आहे, पुढल्या वर्षी ईदच्या दिवशी हा चित्रपट रिलीज होणार आहे. अजून या चित्रपटाच्या नावाची अधिकृत घोषणा मेकर्सनी केलेली नाही, मात्र या चित्रपटाचं नाव ‘मॉन्स्टर’ असेल अशी चर्चा आहे. दरम्यान या चित्रपटाबद्दल अशी एक अपडेट समोर आली आहे, ज्यामपळे सलमानच्या चाहत्यांचा उत्साह आणखी वाढेल.

खरंतर मेकर्सनी ‘मॉन्स्टर’ म्ध्ये एक ट्रेन फाईट सीक्वेन्स प्लान केला आहे. ट्रेनच्या आतमध्ये सलमान खान हा दुश्मनांशी दोन हात करताना दिसेल. सध्या मेकर्स सलमान खानचा बॉडी डबर परवेझ काझीसोबत ट्रेनमध्ये या फाईट सीनचं शूटिंग करत आहेत. हा चित्रपटातील सर्वात महत्वाचा ॲक्शन सीनपैकी एक आहे. हा सीन खूपच कठी असून त्या खूप मूव्हमेंट आणि ताळमेळ साधण्याची गरज आहे, असं सूत्रांनी सांगितल्याचं एका रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

शूटिंगपासून दूर होता परवेझ काझी

सलमान खान प्रत्येक बीटवर कसं काम करतो हे परवेझला अगदी नीट माहीत आहे, त्यामुळे त्याची उपस्थिती आवश्यक आहे. सध्या गोरेगावच्य आरे कॉलनीत एक सेट बनवण्यात आला असून तिथे या सीनचं शूटिंग सुरू आहे. खरंतर काही काळापूर्वी परवेझ काझी हा आजारी पडला होता. हृदयाशी संबंधित समस्येमुळे तो सेटपासून दूर होता. तो गैरहजर असताना सलमान खाननेच अनेक ॲक्शन सीक्वेन्स शूट केले होते, अशी माहिती समोर आली आहे.

या चित्रपटात सलमानचा बॉडी डबल होता परवेझ 

आता परवेझ काझीची तब्येत सुधारली असून तो शूटिंगसाठी आला आहे. परत येताच त्याने कामाला सुरूवात केली आहे. या चित्रपटातील ॲक्शन सीक्वेन्स लवकरच शूट होतील अशी मेकर्सना आशा आहे. परवेझ काझी हा अनेक वर्षांपासून सलमानचा बॉडी डबल म्हणून काम करतोय. ‘टायगर जिंदा है’, ‘दबंग 3’, ‘रेस 3’ यासह अनेक चित्रपटांत त्याने सलमानचा बॉडी डबल म्हणून काम केलंय. दरम्यान या चित्रपटात अभिनेत्री नयनतार ही सलमानच्या अपोझिट काम करणार आहे . त्याशिवाय अभिमन्यु सिंह, राजपाल यादव, जैकी श्रॉफ आणि राहुल देव हे कलाकारही या चित्रपटात झळकतील.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *