Sachin Ahir and Aaditya Thackeray: ठाकरे गटाचे मुंबईतील मातब्बर नेते आणि विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांना मंगळवारी शिंदे गटाकडून विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाचा अर्ज भरुन ठाकरे गटासह राजकीय वर्तुळाला मोठा धक्का दिला. सचिन अहिर (Sachin Ahir) मंगळवारी सकाळी निवडणूक अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज भरायला पोहोचले तेव्हा ते शिंदे गटात गेल्याचा उलगडा सगळ्यांना झाला. तत्पूर्वी सचिन अहिर यांनी ठाकरे गटातील (Thackeray Camp Shivsena) केवळ दोन नेत्यांना आपण पक्षांतर करत असल्याची कल्पना दिली होती. (Maharashtra Politics news)
सूत्रांच्या माहितीनुसार, सचिन अहिर यांनी आदित्य ठाकरे यांना आज सकाळी संपर्क साधून पक्ष सोडणार संदर्भातील भूमिका मांडली होती. सचिन अहिर यांनी भारतीय कामगार सेना आणि बेस्ट कर्मचारी सेनेच्या पदावरून राजीनामा दिला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सचिन आहोत हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात होते. आता उद्याच्या निवडणुकीत विजयी झाल्यावर सचिन अहिर यांच्याकडे पुढील दोन वर्षाकरिता उपसभापती पद असणार आहे.
Sachin Ahir and Ambadas Danve: सचिन अहिरांनी सर्वात आधी पक्ष सोडण्याबद्दल ठाकरे गटातील कोणत्या नेत्याला सांगितलं? इंग्रजीत मेसेज करुन म्हणाले, ‘आय… ‘
सचिन अहिर यांनी सोमवारी रात्री अंबादास दानवे यांनाही आपण पक्ष सोडणार असल्याची पुसटशी कल्पना दिली होती. याबाबत अंबादास दानवे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, मला सकाळी 11.30 वाजता सचिन अहिर यांनी इंग्रजीत मेसेज केला. त्या मेसेजमध्ये मला राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी मी काही निर्णय घेतोय, असे ते म्हणाले. काल रात्रीपर्यंत आम्ही सोबत होतो, सोबतच इथून गेलो. त्यांनी असा निर्णय का घेतला हे बघावं लागेल. वरळी ही शिवसेनेचीच आहे, सुनिल शिंदे यांनी सचिन अहिर यांना हरवूनच ते आमदार झाले होते. अशात, ते जाण्याने काही फरक पडणार नाही. आम्ही उपसभापती पदासाठी अर्ज भरला आहे. अभ्यंकर सरांचा अर्ज आम्ही भरला आहे, असे अंबादास दानवे यांनी म्हटले.
आणखी वाचा
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?