Ruturaj Gaikwad fined IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सचा आयपीएल 2026 मधील प्रवास अखेर लाजिरवाण्या पराभवासह संपला. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात दारुण पराभव पत्करल्यानंतर चेन्नईच्या जखमेवर मीठ चोळणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने स्लो ओव्हर रेटमुळे चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडसह संपूर्ण संघावर मोठा दंड ठोठावला आहे.
Clinical. Crushing. Comprehensive 💙@gujarat_titans cap off the league stage with an 8️⃣9️⃣-run win at home 🏟️
Scorecard ▶️ https://t.co/p5TP9NLREX #TATAIPL | #KhelBindaas | #GTvCSK pic.twitter.com/32vf9sbLGc
— IndianPremierLeague (@IPL) May 21, 2026
नेमकं काय घडलं? (Ruturaj Gaikwad Fine GT vs CSK IPL 2026)
या हंगामात चेन्नईकडून दुसऱ्यांदा स्लो ओव्हर रेटची चूक झाली. यापूर्वीही 18व्या सामन्यात संघ वेळेत षटके पूर्ण करू शकला नव्हता. आयपीएल आचारसंहितेतील नियम 2.22 अंतर्गत यावेळी कर्णधार ऋतुराज गायकवाड यांच्यावर तब्बल 24 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. इतकेच नव्हे, तर इम्पॅक्ट प्लेयरसह उर्वरित सर्व खेळाडूंनाही दंडाची शिक्षा झाली. प्रत्येक खेळाडूला 6 लाख रुपये किंवा सामन्याच्या फीच्या 25 टक्के रक्कम (यापैकी जी कमी असेल) इतका दंड भरावा लागणार आहे.
🚨 Ruturaj Gaikwad FINED ₹12 LAKHS FOR SLOW OVER-RATE 🚨 pic.twitter.com/2X6Eq681xh
— Faruk (@uf2151593) April 12, 2026
सीएसके 14 पैकी फक्त 6 सामने जिंकले (GT vs CSK IPL 2026)
ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सचा हा हंगाम पूर्णपणे निराशाजनक ठरला. संघाने 14 पैकी केवळ 6 सामने जिंकले. 12 गुण आणि -0.345 च्या खराब नेट रनरेटमुळे चेन्नईला प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नाही. विशेष म्हणजे सलग तिसऱ्या हंगामात चेन्नई प्लेऑफपासून दूर राहिली आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने 2023 मध्ये शेवटचे आयपीएल विजेतेपद जिंकले होते.
चेन्नईचा लाजिरवाणा पराभव (Ruturaj Gaikwad Fine GT vs CSK IPL 2026)
गुजरातविरुद्धचा 89 धावांचा पराभव हा चेन्नईच्या आयपीएल इतिहासातील धावांच्या फरकाने सर्वात मोठा पराभव ठरला. या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 बाद 229 धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नईचा डाव अवघ्या 13.4 षटकांत 140 धावांवर आटोपला. या संपूर्ण हंगामात चेन्नईला सर्वाधिक उणीव जाणवली ती एमएस धोनीची. दुखापतीमुळे धोनीला यंदाच्या आयपीएलमध्ये एकही सामना खेळता आला नाही आणि त्याचा मोठा फटका संघाला बसल्याचे स्पष्ट दिसून आले.
हे ही वाचा –
आणखी वाचा