Rohit Sharma World Cup 2027 : रोहित शर्माला वर्ल्ड कपमधून बाहेर बसवणार? BCCIच्या टेन्शनमागचं खरं कारण समोर, नवा ओपनर शोधायला सुरुवात?


Rohit Sharma World Cup 2027 : बीसीसीआयसमोर आता नव्या डोकेदुखीने उभं ठाकलं आहे. पुढच्या वर्षी आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2027 दक्षिण आफ्रिकेत होणार असताना टीम इंडियाचे दोन मोठे आधारस्तंभ रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याच्या फिटनेसनेच बीसीसीआयची झोप उडवली आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी दोघांची निवड झाली असली, तरी ते 50 षटकांचा सामना पूर्ण ताकदीने खेळू शकतील का, हा मोठा प्रश्न निवड समितीसमोर उभा आहे.

रोहित शर्माबाबत नेमकी चिंता काय? (Rohit Sharma World Cup 2027)

रोहित शर्मा आयपीएलदरम्यान हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे जवळपास तीन आठवडे मैदानाबाहेर होते. या काळात त्याने बीसीसीआयच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये फिटनेस टेस्टही दिली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, रोहितने वजन कमी केलं असलं तरी वाढतं वय आणि शरीरावर पडणारा ताण यामुळे बीसीसीआय साशंक आहे. वनडे क्रिकेटमध्ये सलग 50 षटकं मैदानात राहावं लागतं. आयपीएलसारखा ‘इम्पॅक्ट प्लेयर’चा पर्याय इथे नसल्यामुळे रोहितची शारीरिक क्षमता आणि स्टॅमिना यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. निवडकर्त्यांनी त्याचा सविस्तर फिटनेस रिपोर्ट मागवला आहे. जर वर्ल्ड कपपर्यंत रोहित पूर्ण फिट राहिला नाहीत, तर ओपनिंगची जबाबदारी कोण सांभाळणार, याचाही विचार सुरू झाला आहे. यशस्वी जैस्वालला भविष्यातील पर्याय मानलं जात असलं तरी त्याचा वनडे अनुभव मर्यादित आहे. त्यामुळे इशान किशनला बॅकअप ओपनर म्हणून तयार ठेवलं जात आहे.

हार्दिक पांड्याची फिटनेस पुन्हा चर्चेत (Rohit Sharma World Cup 2027)

हार्दिक पांड्याने 2 मेनंतर चेन्नईतील सामन्यानंतर पाठदुखीची तक्रार केली होती. सध्या तो रिलायन्स सेंटर आणि वानखेडे स्टेडियममध्ये सराव करत आहेत. मात्र ते पूर्णपणे फिट आहेत का, याबाबत अजूनही स्पष्टता नाही. बीसीसीआयची सर्वात मोठी चिंता म्हणजे हार्दिक संपूर्ण 10 षटकं गोलंदाजी करत नाहीत. जानेवारीत ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ने त्याने न्यूझीलंडविरुद्ध 10 षटकं टाकण्यासाठी फिट नसल्याचं सांगितलं होतं. मात्र अवघ्या काही दिवसांनी त्याने विजय हजारे ट्रॉफीत बडोद्याकडून 10 षटकं टाकली होती. यामुळे निवडकर्ते संभ्रमात आहेत. त्याचा पर्याय म्हणून आता नितीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणा यांना ऑलराउंडर म्हणून तयार करण्यावर भर दिला जात आहे.

रोहित आणि विराटमध्ये आता फरक? (Rohit Sharma World Cup 2027)

सूत्रांच्या माहितीनुसार, बीसीसीआय आता विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याकडे एकाच नजरेतून पाहत नाही. कोहलीची फिटनेस आणि फॉर्म अजूनही संघातील इतर खेळाडूंपेक्षा सरस मानली जात आहे. त्यामुळे रोहितबाबत अंतिम निर्णय मेडिकल टीमच्या अहवालानंतरच घेतला जाणार आहे. 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर कर्णधारपद सोडल्यानंतर रोहितच्या खेळातही बदल दिसून आला आहे. पूर्वीसारखी आक्रमक फलंदाजी ते करत नसल्याने टीम मॅनेजमेंटही समाधानी नसल्याचं समोर आलं आहे.

हे ही वाचा –

IPLचा चेहरामोहरा बदलणार? 100 मीटरचा सिक्स 8 धावा अन् 3 विकेट्सवर मिळणार एक्स्ट्रा ओव्हर, BCCIकडे पोहोचला भन्नाट प्रस्ताव

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *