Suraj Chavhan Sanjana Dohal Jevan Video: सूरज चव्हाण बाबा होणार! पत्नी संजनाचं थाटात डोहाळजेवण; जान्हवी किल्लेकरचा VIDEO गुलिगत व्हायरल


Suraj Chavan Sanjana: बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सुरज चव्हाण (Suraj Chavan) कोणत्या ना  कोणत्या कारणाने कायम चर्चेत असतो. सध्या तो चर्चेत आहे त्याच्या गुडन्यूजमुळे. दोन दिवसांपूर्वीच अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने (Janhavi Killekar) संजनाच्या चोरओटीचा Video शेअर करत संजना गरोदर असल्याचं कन्फर्म केलं. आता जान्हवीने सुरज आणि संजनाच्या डोहाळजेवणाचा व्हिडिओ शेअर केलाय. जान्हवीने ‘मी आत्या होणार आहे’ सांगत सुरज आणि संजानासोबत ही पोस्ट केली आहे.

सुरज संजनाचं थाटामाटात डोहाळजेवण 

खरंतर बिग बॉसच्या घरातील मैत्री, नातं त्या घराबाहेर आल्यावर टिकत नाही असं म्हणतात. पण याला काही अपवाद आहेत. जान्हवी किल्लेकर आणि सुरज चव्हाणचंही तेच आहे.बिग बॉसच्या घरात स्पर्धक असणारी  जान्हवी आता  सुरजची मानलेली बहिण आहे. सूरजच्या लग्नापासून त्याच्या प्रत्येक सुख दु:खात ती सहभागी होताना दिसते. त्याच्या लग्नात ती चाहत्यांना मिरवताना दिसली. सूरजच्या नव्या घरातील सगळ्या विधींनाही ती उपस्थित होती. आता सुरज बाबा होणार आहे, त्यामुळे त्याची सगळी कोडकौतुकं करताना ती दिसतेय.

तिने शेअर केलेल्या VIdeo मध्ये ती संजनाची ओटी भारतानं दिसतेय. संजनाच्या डोहाळ जेवणाच्या अनेक पोस्ट तिने केल्या आहेत. तिच्या या पोस्टला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिलाय. बहिणीचं कर्तव्य ती पूर्ण करत असल्याचं अनेकांनी  म्हटलंय. दरम्यान, होणाऱ्या बाळाच्या आगमनाची चाहूल लागल्याने सूरज आणि संजनाच्या घरी आनंदाचं वातावरण आहे. यानिमित्ताने संजनासाठी खास डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात संजनाच्या लूकने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. हिरव्या रंगाच्या डिझायनर साडीत ती अत्यंत सुंदर दिसत होती. हातांवरील मेहंदी आणि फुलांच्या दागिन्यांनी तिच्या सौंदर्यात आणखी भर घातली होती. विशेष म्हणजे, याआधी मार्च महिन्यात अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने संजनाची चोरओटी भरली होती. त्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. दरम्यान, सूरज आणि संजना यांनी नोव्हेंबर 2025 मध्ये बारामती येथे थाटामाटात लग्नगाठ बांधली होती.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *