Rhea Kapoor : 1.35 कोटींचे इयरिंग्स हवेतच गायब… रिया कपूर फॅशन इव्हेंटला पोहोचण्याआधीच सनसनाटी चोरी | ताज्या मनोरंजन बातम्या


Last Updated:

मुंबईच्या सहार पोलीस स्टेशनमध्ये 1.35 कोटी रुपयांच्या किमतीचे इयरिंग्स (कानातले) चोरी झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

1.35 कोटींचे इयरिंग्स हवेतच गायब... रिया कपूर फॅशन इव्हेंटला पोहोचण्याआधीच सनसनाटी चोरी
1.35 कोटींचे इयरिंग्स हवेतच गायब… रिया कपूर फॅशन इव्हेंटला पोहोचण्याआधीच सनसनाटी चोरी

मुंबई : मुंबईच्या सहार पोलीस स्टेशनमध्ये 1.35 कोटी रुपयांच्या किमतीचे इयरिंग्स (कानातले) चोरी झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सवलीन सिंग (वय 41 वर्ष) यांनी सहार पोलीस स्टेशनमध्ये हिरे असलेले इयरिंग्स चोरी झाल्याची तक्रार केली. सवलीन सिंग मेकअप आर्टिस्ट असून चित्रपट निर्माती आणि फॅशन आयकॉन रिया कपूरसोबत मागच्या 7 वर्षांपासून काम करत आहे. सवलीन सिंग वेगवेगळ्या फॅशन इव्हेंटमध्ये रिया कपूरच्या मेकअपचं कामही करते.

29 एप्रिल 2026 ला न्यूयॉर्कमध्ये आयोजित होणाऱ्या प्रतिष्ठित फॅशन इव्हेंट मेट गालामध्ये जाण्यासाठी रिया कपूरला आमंत्रित केलं गेलं होतं. त्यानिमित्त रिया कपूरची मेकअप टीमही सोबत गेली. टीमसोबत रिया कपूरसाठी मुंबईच्या मेहता ज्वेलर्स आणि गोएंका ज्वेलर्सकडून भाड्याने घेतलेले इयरिंग्स सवलीन सिंगला देण्यात आले होते. हे इयरिंग्स सवलीनने तिच्या हँडबॅगमध्ये सुरक्षित ठेवले होते.

हवेतच गायब झाले इयरिंग्स?

27 एप्रिल 2026 च्या रात्री 10.25 वाजता मुंबईहून दुबईमागे न्यूयॉर्कला जाण्यासाठी रिया कपूरच्या टीमने एमिरेट्सचं फ्लाईट पकडलं. टीम 28 एप्रिल 2026 ला संध्याकाळी 5.30 वाजता न्यूयॉर्कमध्ये दाखल झाली, यानंतर सर्व सदस्य हॉटेलमध्ये पोहोचले. यानंतर सवलीनने जेव्हा तिची पर्स चेक केली तेव्हा दोन्ही इयरिंग्स बॉक्समध्ये इयरिंग्स नव्हत्या. प्रवासादरम्यान अज्ञात व्यक्तीने दोन्ही जोडी इयरिंग्स चोरी झाल्याचा संशय आहे.

मेहता ज्वेलर्सचे एमराल्ड स्टोन आणि डायमंड असलेल्या सोन्याच्या कानातल्यांची किंमत 66 लाख रुपये आहे. तर गोएंका ज्वेलर्सच्या जाम्बियन एमराल्ड स्टोन आणि सोन्याचे बॉर्डर असलेल्या कानातल्यांची किंमत 69 लाख रुपये आहे. या दोन्ही दागिन्यांची एकूण किंमत 1 कोटी 35 लाख रुपये आहे.

सहार पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. चोरी मुंबई ते दुबई, दुबई ते न्यूयॉर्क दरम्यान विमानात झाली का त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी झाली? याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या/मनोरंजन/

Rhea Kapoor : 1.35 कोटींचे इयरिंग्स हवेतच गायब… रिया कपूर फॅशन इव्हेंटला पोहोचण्याआधीच सनसनाटी चोरी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *