PhonePe युझर्ससाठी नवा नियम लागू, दर 3 महिन्याला कट होणार 100 रुपये; कंपनीने इनॲक्टिव्ह वॉलेटवर युझर्सना दिला मोठा झटका! | बिझनेस


Last Updated:

PhonePe युझर्ससाठी कंपनीने वॉलेट पॉलिसीत मोठा बदल केला आहे. इनॲक्टिव्ह वॉलेटवर प्रत्येक तिमाहीला 100 रुपये फी लागू होणार असल्याने लाखो ग्राहकांना सतर्क राहावे लागणार आहे.

News18
News18

मुंबई: डिजिटल पेमेंट्स प्लॅटफॉर्म PhonePe च्या युझर्ससाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कंपनीने आपल्या वॉलेट धोरणात (Wallet Policy) बदल केला असून दीर्घकाळ वॉलेटचा वापर न करणाऱ्या ग्राहकांकडून आता इनॲक्टिव्ह मेंटेनन्स शुल्क (Inactive Maintenance Fee) आकारले जाणार आहे. कंपनीने याबाबत आपल्या अधिकृत ब्लॉग पोस्टद्वारे माहिती दिली आहे.

प्रत्येक तिमाहीला 100 रुपयांचे शुल्क

PhonePe च्या नव्या धोरणानुसार जर एखाद्या युझर्सने सलग 365 दिवस आपल्या PhonePe वॉलेटद्वारे कोणताही आर्थिक व्यवहार (Financial Transaction) केला नाही, तर त्याचे वॉलेट ‘इनॲक्टिव्ह’ श्रेणीत टाकले जाईल. यानंतर त्या युझर्सकडून प्रत्येक तिमाहीला (Quarterly) 100 रुपये (GSTसह) इनॲक्टिव्ह मेंटेनन्स शुल्क आकारले जाईल.

फक्त UPI व्यवहार केल्याने चालणार नाही

कंपनीने स्पष्ट केले आहे की फक्त PhonePe अॅप उघडणे किंवा UPI द्वारे बँक खात्यातून व्यवहार करणे ही वॉलेट अॅक्टिव्हिटी मानली जाणार नाही.

ब्लॉग पोस्टमध्ये कंपनीने म्हटले आहे की, PhonePe अॅपमध्ये लॉग-इन करणे, UPI व्यवहार करणे,मोबाईल रिचार्ज,वीज, पाणी किंवा इतर बिलांचे पेमेंट,क्रेडिट कार्ड पेमेंट,कर्ज (Loan) संबंधित व्यवहार,विमा (Insurance) व्यवहार,KYC पूर्ण करणे या कोणत्याही गोष्टी वॉलेट अॅक्टिव्हिटी म्हणून ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.

वॉलेटद्वारेच व्यवहार करावा लागेल

PhonePe चे म्हणणे आहे की वॉलेट सक्रिय ठेवण्यासाठी युझर्सनी थेट PhonePe वॉलेटमधून व्यवहार करणे आवश्यक आहे. कंपनीने सांगितले की इनॲक्टिव्ह शुल्क आकारण्यापूर्वी ग्राहकांना पूर्वसूचना दिली जाईल. शुल्क वजा करण्याच्या 15 दिवस आधी युझर्सला नोटीस पाठवली जाईल. या नोटीस कालावधीत जर युझर्सने वॉलेटमधून एखादा व्यवहार केला, तर त्याचे वॉलेट पुन्हा सक्रिय (Active) म्हणून नोंदवले जाईल आणि शुल्क आकारले जाणार नाही.

शुल्क कसे वसूल केले जाईल?

जर वॉलेटमध्ये पुरेशी शिल्लक असेल, तर PhonePe थेट वॉलेटमधून 100 रुपये इनॲक्टिव्ह मेंटेनन्स शुल्क वजा करेल. जर वॉलेटमध्ये 100 रुपयांपेक्षा कमी रक्कम असेल, तर उपलब्ध असलेली संपूर्ण रक्कम वजा केली जाईल. कंपनी कोणत्याही परिस्थितीत नकारात्मक शिल्लक (Negative Balance) निर्माण करणार नाही. उपलब्ध रक्कम वजा करून शिल्लक शून्य केली जाईल.

शुल्क टाळण्याचा सोपा उपाय

तज्ज्ञांच्या मते हे शुल्क टाळण्यासाठी युझर्सनी वर्षातून किमान एकदा PhonePe वॉलेटद्वारे एखादा व्यवहार करणे आवश्यक आहे. वर्षातून फक्त एक व्यवहार केल्यास वॉलेट सक्रिय राहील आणि इनॲक्टिव्ह शुल्क आकारले जाणार नाही.

यापूर्वीही अशा प्रकारचे शुल्क

डिजिटल पेमेंट क्षेत्रात अशा प्रकारचे शुल्क आकारण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2021 मध्ये MobiKwik ने देखील दीर्घकाळ वॉलेट वापरत नसलेल्या ग्राहकांसाठी वॉलेट मेंटेनन्स शुल्क लागू केले होते. PhonePe च्या या नव्या निर्णयामुळे लाखो युझर्सनी आता आपल्या वॉलेटचा नियमित वापर करणे किंवा किमान वर्षातून एकदा व्यवहार करणे आवश्यक ठरणार आहे.

मराठी बातम्या/मनी/

PhonePe युझर्ससाठी नवा नियम लागू, दर 3 महिन्याला कट होणार 100 रुपये; कंपनीने इनॲक्टिव्ह वॉलेटवर युझर्सना दिला मोठा झटका!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *