RCB vs GT Qualifier 1: पावसामुळं क्वालिफायर-1 रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण? बंगळुरु की गुजरात, जाणून घ्या IPL चा नियम 


RCB vs GT Qualifier 1 धर्मशाला :  आयपीएलच्या 19 व्या हंगामाचा अखेरचा टप्पा सुरु झाला आहे. लीग स्टेजमधील सामने संपून आता उद्यापासून प्लेऑफचे सामने सुरु होत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स यांच्यात क्वालिफायर-1 चा सामना धर्मशालामध्ये होणार आहे. गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात कोण बाजी मारत अंतिम फेरीचं तिकीट मिळवणार याकडे सर्वाचं  लक्ष लागलं आहे.  मात्र, या सामन्यात पावसानं व्यत्यय आणला किंवा पावसामुळं सामना रद्द झाला तर कोणता संघ आयपीएल फायनलमध्ये पोहोचणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. 

आयपीएलच्या लीग स्टेजमध्ये गुणतालिकेत पहिल्या चार स्थानांवर असलेले संघ  प्लेऑफमध्ये पोहोचतात. त्यानुसार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, गुजरात टायटन्स, सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे चार संघ प्लेऑफमध्ये दाकल झाले आहेत. या वेळी टॉप-2 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स आहेत. यांच्यामध्ये जो संघ विजयी होईल तो अंतिम फेरीत पोहोचेल. तर, पराभूत संघाला अंतिम फेरीत पोहोचण्याची आणखी एक संधी असेल. क्वालिफायर-1 मध्ये पराभूत झालेला संघ क्वालिफायर-2 ची मॅच खेळेल. 

गुणतालिकेत तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर असलेल्या संघांमध्ये एलिमिनेटरचा सामना होणार आहे. विजयी होणारा संघ क्वालिफायर-2 मध्ये पोहोचेल. एलिमिनेटरचा सामना बुधवारी सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. 

क्वालिफायर-1 राखीव दिवस आहे का?

आयपीएलच्या प्लेईंग कंडीशनमध्ये राखीव दिवसासंदर्भात स्पष्टता नाही. मात्र, नियम 13.7.3 नुसार प्लेऑफमध्ये राखीव  दिवस असू शकतो. मात्र, क्वालिफायर -1 आणि एलिमिनेटर या दोन्ही सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवलेला नाही. फक्त, अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस आहे. 

2023 मध्ये आयपीएल फायनल राखीव दिवशी खेळवण्यात आली होती. आयपीएल 2026 मध्ये क्वालिफायर-1 साठी राखीव दिवस नाही. त्यामुळं पावसामुळं सामना होऊ शकला नाही तर अंतिम सामन्यात कोण पोहोचणार असा प्रश्न निर्माण होतो, त्यासंदर्भातील उत्तर प्लेइंड कंडीशनमध्ये आहे. 

क्वालिफायर-1 मॅचसाठी अतिरिक्त वेळ असेल ज्यात मॅच किमान 5-5 ओव्हरची असेल. मात्र, या वेळेत देखील सामना झाली नाही, पावसामुळं बंगळुरु आणि गुजरात मॅच रद्द झाल्यास लीग स्टेजमध्ये पहिल्या स्थानावर असलेला संघ आयपीएल फायनलमध्ये पोहोचेल. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांचे गुण  18-18 इतके आहेत. मात्र, नेट रनरेटच्या मुद्यावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. त्यामुळं पावसामुळं मॅच रद्द झाली तर बंगळुरुला अंतिम सामन्याचं तिकीट मिळेल. तर, गुजरात टायटन्सला क्वालिफायर-2 चा सामना खेळावा लागेल. 

हेदेखील वाचा

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *