Ratnagiri : मॅगीने भरलेला ट्रक 100 फुट खोल नदीत कोसळला, पाण्याच्या प्रवाहात 400 मीटर वाहून गेला, ड्रायव्हर सापडला का? | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

जगबुडी नदीच्या पुलावरून भरधाव कंटेनर थेट 100 फूट खोल नदीत कोसळल्याची घटना गुरूवारी घटना घडली होती. या घटनेनंतर कंटेनर नदीच्या प्रवाहात वाहून गेला होता. या अपघाताचे हादरवून टाकणारे व्हिडिओ आणि फोटो समोर आले होते.

News18
News18

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भरणे नाका येथील जगबुडी नदीच्या पुलावरून भरधाव कंटेनर थेट 100 फूट खोल नदीत कोसळल्याची घटना गुरूवारी घटना घडली होती. या घटनेनंतर कंटेनर नदीच्या प्रवाहात वाहून गेला होता. या अपघाताचे हादरवून टाकणारे व्हिडिओ आणि फोटो समोर आले होते. पण चालकाचा काही एक थांगपत्ता लागला नव्हता. पण या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे.

खरं तर गोव्याहून मुंबईच्या दिशेने मॅगीने भरलेला एक कंटेनर जात होता. या कंटेनरवरील चालकाचा अचानक ताबा सुटल्याने हा कंटेनर जगबुडी नदीच्या पुलावरील कठडा तोडत थेट सुमारे 100 फूट खोल नदीत कोसळला. खर हा पुल येणाऱ्या वाहनांसाठी वेगळा आणि जाणाऱ्या वाहनांसाठी वेगळा होता.वेगळा यासाठी कारण दोन्ही पुलाच्या मध्ये काहीसे अंतर होते. या अंतरामधूनच बरोबर हा कंटेनर 100 फुट खोल दरीत कोसळला होता. तुम्ही जर अंतर पाहिले तर तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही, इतक्या कमी अतंरातून तो खाली कोसळला होता.

नदीत पडल्यानंतर तो जवळ 400 मीटर वाहून गेला होता.या घटनेनंतर चालक आणि वाहकांचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला पण त्याचा काही एक थांगपत्ता लागला नाही. त्यात काल सायंकाळी उशीरा हा अपघात झाल्याने अंधारात शोधकार्य राबवणे प्रचंड अवघड होते. तसेच नदीचा वेगवान प्रवाह, खोल पाणी ट्रकडे अवघड स्थान यामुळे चालकापर्यंत पोहोचण्यात प्रचंड अडचणी येत होत्या.

पण अखेर आज बचाव पथकाने अथक प्रयत्न करत ट्रकमध्ये अडकलेल्या चालकाचा मृतदेह बाहेर काढला आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, मृत चालकाची ओळख व अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. याप्रकरणी, घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/

Ratnagiri : मॅगीने भरलेला ट्रक 100 फुट खोल नदीत कोसळला, पाण्याच्या प्रवाहात 400 मीटर वाहून गेला, ड्रायव्हर सापडला का?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *