तुम्ही पंतप्रधानांना ‘देव’ मानता; मराठमोळ्या अभिनेत्याची संतप्त प्रतिक्रिया – Marathi News | Marathi actor Suvrat Joshi shared a strong social media post on the NEET protest


सध्या संपूर्ण देशाचे लक्ष हे दिल्ली येथील जंतर मंतर येथे सुरु असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाकडे आहे. या आंदोलनात लाखो विद्यार्थांसोबतच अनेक विरोधी पक्ष नेत्यांनी सहभाग घेत विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दिला. आता मराठी अभिनेता सुव्रत जोशीने नीट पेपर लीक प्रकरणात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावरून भाजप समर्थकांसाठी एक तिखट पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने भाजप समर्थकांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे.

काय आहे सुव्रत जोशीची पोस्ट?

सुव्रत जोशीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला, प्रिय भाजप समर्थकांनो, तुम्ही एक लाख विद्यार्थ्यांकडून संपूर्ण जबाबदारीची मागणी करत आणि तुम्हाला अपेक्षा आहे की, विद्यार्थ्यांचे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण असावे. कोणताही गोंधळ, कोणतीही चूक नको. पण तुमचा सर्वात मोठा दुतोंडीपणा हा आहे की, ‘शिक्षणमंत्र्यांनी’ अजूनही राजीनामा दिलेला नाही आणि त्यांना पंतप्रधानांचा पाठिंबा आहे; तरीही ते राजीनामा का देत नाहीत, असा प्रश्न विचारण्याची तसदीही तुम्ही घेत नाही. कारण तुम्ही पंतप्रधानांना ‘देव’ मानता.

सोपे काय आहे?

एका मंत्र्याचा राजीनामा घेणे सोपे आहे की,
एक लाख विद्यार्थ्यांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे सोपे आहे? या आशयाची पोस्ट शेअर केली आहे. सुव्रत जोशीची ही पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Suvrat Joshi

या संपूर्ण परिस्थितीला कोण जबाबदार आहे? पेपर लीकसारख्या गंभीर प्रकरणात जबाबदारी कोण घेणार? विद्यार्थी आंदोलनाला जबाबदार धरणे सोपे आहे, पण ज्या मंत्र्याच्या खात्यामध्ये ही परीक्षा घेतली जाते, त्यांच्या जबाबदारीचा प्रश्न का टाळला जातो? असे प्रश्न सुव्रत जोशीने पोस्टमध्ये उपस्थित केले आहेत.

विद्यार्थी आंदोलन आणि राजकीय जबाबदारी

नीट पेपर लीक प्रकरणाने लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. या प्रकरणात शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. मात्र, सत्ताधारी पक्ष आणि त्याचे समर्थक याकडे दुर्लक्ष करत आहेत. सुव्रत जोशी यांचा असा विश्वास आहे की, खरी जबाबदारी स्वीकारण्याची वेळ आली आहे. एका मंत्र्याच्या राजीनाम्यापेक्षा लाखो विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळणे आणि त्यांचे भविष्य धोक्यात घालणे हे गंभीर आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *