Rajni Ki Baraat Story: बऱ्याचदा छोट्या बजेटचे सिनेमे (Movie Review) ते साध्य करतात, जे बिग बजेट चित्रपट करु शकत नाहीत. तसेही आजकाल बिग बजेट सिनेमे फारसे यशस्वी होत नाहीत. बड्या कलाकारांची (Entertainment) फौज असूनही काही सिनेमे यशस्वी झाले नाही. अशातच असे काही सिनेमे येतात, ज्यांचा बजेट कमी असतो, परंतु अशा सिनेमांचा हेतू आणि मेसेज क्लिअर असतो. इमोशन आणि मनोरंजनही असते. केरळ 2 चित्रपटात झळकलेली उल्का गुप्ता सध्या रजनी की बारात या सिनेमामुळे प्रकाशझोतात आली आहे. हा सिनेमा मनोरंजनाच्या पलिकडे आहे. हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाला असून, स्टोरीमुळे हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन आवर्जून पाहण्यासारखा आहे.
ही कथा रजनी (Rajni Ki Baraat) नावाच्या एका तरुणीची आहे. जी तिच्या मृत वडिलांच्या जुन्या स्कूटरशी संवाद साधत असते. तिचा एका तरुणावर जीव जडतो. ती त्या मुलाच्या प्रेमात पडते. तो मुलगाही तिच्या प्रेमाचा स्वीकार करतो. परंतु, स्टोरीमध्ये एक ट्विस्ट येतो. मुलाचे वडील जे एक पोलीस इन्स्पेक्टर आहेत, त्यांना आपल्या मुलाचे लग्न एका श्रीमंत घरातील मुलीशी लावायचे असते. मुलालाही आपल्या वडिलांची भीती वाटत असते. अशा स्थितीत, तरुणी अशी एक गोष्ट करते, ज्याचा विचार तुम्हीही करू शकत नाही. तरुणी नेमकं काय करते? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सिनेमागृहात जाऊन चित्रपट पाहावा लागेल.
सिनेमाची स्टोरी काय सांगते? (Rajni Ki Baraat Full Movie Review)
हा एक उत्तम फिल्म आहे. कमी बजेटमध्ये निर्मात्यांनी असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे, जे आजकालचे बिग बजेट सिनेमाही देऊ शकत नाहीत. हा सिनेमा तुम्हाला भावनिकरित्या हलवून टाकतो. विशेषत: एका तरुणीचा तिच्या वडिलांच्या जुन्या स्कूटरसोबतचा संवाद खूप हृदयस्पर्शी आहे. सिनेमाचे बजेट कमी जरी असले तरी, लेखन प्रभावी आहे. सिनेमा कुठेही रेंगाळत नाही. हा सिनेमा तुम्हाला हसवतो आणि शिकवतोसुद्धा.
हा सिनेमा आहे तरी कसा?
हा सिनेमा तुम्हाला जे साध्य करता आले नाही, ते करण्याचे धैर्यसुद्धा देईल. हा सिनेमा देशी आणि आधुनिक विचारांचे मिश्रण आहे. सिनेमा पाहताना तुमच्या लक्षात येईल की, जर निर्मात्यांकडे बिग बजेट आणि मोठे स्टार्स असते, तर कदाचित या सिनेमाने कमाल केली असती. हा एक कौटुंबिक सिनेमा आहे. हा सिनेमा आवर्जून पाहण्यासारखा आहे.
सिनेमातील कलाकारांची अॅक्टिंग कशी?
या सिनेमात उल्का गुप्ता लीड रोलमध्ये आहे. तिनं या सिनेमात रजनी हे पात्र साकारलं आहे. अश्वथ भट्टने या सिनेमात पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका साकारली आहे. अश्वथ भट्टना आपण चित्रपटातील मेन व्हिलन म्हणून पाहू शकतो. सुनीता राजवारने या सिनेमात रजनीच्या आईची भूमिका साकारली आहे. झरीना वहाब यांनी रजनीच्या आजीची भूमिका साकारली आहे. कनिष्क विजयनं रजनीच्या प्रियकराची भूमिका साकारली आहे. तर, इशिता सिंहनं राधा हे पात्र उत्तमरित्या साकारलं आहे.
रायटिंग आणि डायरेक्शन (Rajni Ki Baraat Audience Review)
‘रजनी की बारात’ हा सिनेमा सुभाष चंदर यांची शॉर्ट स्टोरी ‘रज्जन की दुल्हनिया’वर आधारीत आहे. पटकथा आणि संवाद आदित्य अमन आणि अनुपम पुरोहित यांनी लिहिले असून, दिग्दर्शन आदित्य अमन यांनी केले आहे. या सिनेमाचे लेखन उत्तम आहे. आणखी संवादात विनोद असता तर, हा सिनेमा आणखी चांगला झाला असता.
रेटिंग 3 स्टार.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
‘राजा शिवाजी’ सिनेमासाठी रितेश देशमुखचा थेट CM फडणवीसांना फोन; अडचण सांगताच एका रात्रीत केली मदत
ABP माझाच्या बातम्या LIVE…