PV Sindhu : पीव्ही. सिंधूने इतिहास रचला; जपान ओपन जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला; बलाढ्य प्रतिस्पर्ध्याच्या घरच्याच मैदानावर करेक्ट कार्यक्रम


PV Sindhu Japan : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही. सिंधू (PV Sindhu) हिने जपान ओपन सुपर 750 स्पर्धेत (Japan Open First Super 750 Title) अफलातून कामगिरी करत इतिहास रचला आहे. अंतिम फेरीत तिने जपानच्या आणि माजी विश्वविजेत्या अकेन यामागुचीवर (PV Sindhu Beats Akane Yamaguchi) मिळवलेल्या धडाकेबाज विजयामुळे सिंधूच्या कारकिर्दीचे जणू दुसरे पुनरागमन झाले आहे. तिने आपली संपूर्ण ताकद आणि आक्रमकता पणाला लावून आपल्या या कट्टर प्रतिस्पर्ध्याचा 21-17, 21-17 अशा अंकांनी पराभव केला आणि ‘जपान ओपन सुपर ७५०’चे विजेतेपद (PV Sindhu wins maiden Japan Open title) पटकावले आहे.

पीव्ही. सिंधू हिने आपल्या या दैदीप्यमान कामगिरीने देशासह क्रीडाविश्वात मोठा आनंदाचं वातावरण आहे. तर या दैदीप्यमान कामगिरीने तिच्या कारकिर्दीतील सर्वात महत्वाचा विजय मिळवला असल्याचे बोललं जात आहे. विशेष बाब म्हणजे या विजयासह सिंधू जपान ओपनचे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. (PV Sindhu Beats Akane Yamaguchi)

PV Sindhu : कट्टर प्रतिस्पर्ध्याचा दारुण पराभव; विजेतेपद जिंकणारी सिंधू पहिली भारतीय खेळाडू

दरम्यान, पी.व्ही. सिंधूला तिच्या या पूर्वीच्या खेळात कट्टर प्रतिस्पर्धी समजल्या जाणाऱ्या अकाने यामागुने अनेकदा विजेतेपदांपासून (आशियाई चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसह) वंचित ठेवले आहे. ज्याची सल सिंधूच्या मनात कायम दिसून आली आहे. अशातच रविवारी, 31व्या वर्षी, यामागुचीवर मिळवलेल्या धडाकेबाज विजयामुळे सिंधूच्या कारकिर्दीचे जणू दुसरे पुनरागमन झाले. तिने आपली संपूर्ण ताकद आणि आक्रमकता पणाला लावून ‘जपान ओपन सुपर 750’चे विजेतेपद पटकावले आहे. तर जपानमध्ये एखादे मोठे विजेतेपद जिंकणारी सिंधू पहिली भारतीय खेळाडू ठरली टोकियो ऑलिम्पिक 2021 मधील उपांत्यपूर्व फेरीतील विजयाची पुनरावृत्ती करत तिने आपल्या कारकिर्दीच्या ‘3.0’ टप्प्यातील यशाची नांदी केली.

PV Sindhu Japan : पीव्ही सिंधूची दैदीप्यमान कामगिरी, विजयामागचे महत्व काय?

दरम्यान, यामागुचीने यापूर्वी उंच ‘टॉसेस’ (शटल कॉक उंचावरून मारणे) आणि सातत्यपूर्ण खेळाच्या जोरावर सिंधूला अनेकदा अडचणीत आणले होते. मात्र, रविवारी सिंधूने यामागुचीचा तो खंबीर प्रतिकार मोडून काढला, ज्याने तिला अनेकदा रोखले होते. आणि गेल्या काही वर्षांत ज्याची उणीव भासत होती, असा एक अत्यंत वर्चस्वपूर्ण विजय तिने नोंदवला. या कामगिरीमुळे ‘एलए (LA) ऑलिम्पिक’मध्ये महिला एकेरीत भारताकडून प्रबळ दावेदारीची अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे.

तर हा विजय अन्य कारणांसाठी देशील महत्त्वपूर्ण आहे. कारण हे तिचे पहिले सुपर 750 विजेतेपद आहे. ज्यामुळे ती ही स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय ठरली आहे. सिंधूने यापूर्वी 2024 मध्ये सय्यद मोदी इंटरनॅशनल स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते. 2019 मध्ये जागतिक चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर जपान ओपनमधील हा विजय तिचा सर्वात मोठा विजय आहे. हे सिंधूचे सर्वात मोठे टूर विजेतेपद होते, यापूर्वी तिने 2018 मध्ये वर्ल्ड टूर फायनल्स आणि 2016 मध्ये चायना ओपन जिंकले होते. यामागुचीने तिला 2019 इंडोनेशिया सुपर 1000 फायनल आणि 2019 सुपर सिरीज फायनल्ससह अनेक मोठ्या प्रसंगी पराभूत केले होते. पण या विजयामुळे तिला तिच्या जागतिक चॅम्पियनशिपमधील विजयाची आठवण झाली, जिथे तिने आपल्या प्रतिस्पर्ध्याला मोठ्या फरकाने पराभूत केले होते.

इतर महत्वाच्या बातम्या



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *