England vs India 3rd ODI : ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना सुरु आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या संघाने धावांचा डोंगर रचत इतिहास केला आहे. इंग्लंडने भारतासमोर मालिका विजयासाठी 388 धावांचा लक्ष्य ठेवलं आहे. इंग्लंडसाठी सलामीवीर बेन डकेटने शानदार कामगिरी केली आहे. त्याने 141 धावांची ऐतिहासिक खेळी करून एक नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला.
इंग्लंडने लॉर्ड्सवरील एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्याही नोंदवली. इंग्लंडने 50 षटकांत तीन गडी गमावून 387 धावा केल्या. आता भारतासमोर मालिका जिंकण्यासाठी 388 धावांचे लक्ष्य आहे. दरम्यान, आता या सामन्यात भारतीय फलंदाज कशी कामगिरी करतात याकडे लक्ष असेल. इंग्लंडची लॉर्ड्सवरची सर्वाधिक वनडे धावसंख्या ठरली आहे. यापूर्वी इंग्लंडने भारताविरुद्ध याच मैदानात 1975 मध्ये 4 विकेट गमवून 334 धावा केल्या होत्या. आता हा विक्रम मोडीत निघाला आहे.
बेन डकेटने इतिहास रचला, सर्वात मोठी खेळी खेळली
इंग्लंडसाठी, बेन डकेट आणि जेकब बेथेलने 30.1 षटकांत 192 धावांची सलामीची भागीदारी केली. लॉर्ड्सवरील एकदिवसीय क्रिकेटमधील ही सर्वोच्च सलामीची भागीदारी आहे. जेकब बेथेल 93 चेंडूंमध्ये 11 चौकार आणि दोन षटकारांसह 91 धावांवर बाद झाला. तो प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर बाद झाला. बेन डकेटने 18 चौकार आणि एका षटकारासह 135 चेंडूंमध्ये 141 धावांची ऐतिहासिक खेळी केली. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात लॉर्ड्सवर कोणत्याही फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. लॉर्ड्सवर एकदिवसीय आणि कसोटी या दोन्ही प्रकारात शतके झळकावणारा बेन डकेट हा जगातील सहावा फलंदाज ठरला आहे.
कृष्णा आणि प्रिंस यादव वगळता एकही गोलंदाजाला यश मिळालं नाही
दरम्यान, भारतीय गोलंदाजांचा आज करिष्मा पाहायला मिळाला नाही. भारतीय गोलंदाजा कडून पाच गोलंदाजांनी इंग्लंडसमोर गोलंदाजी केली. पण त्यात प्रसिद्ध कृष्णा आणि प्रिंस यादव वगळता एकही गोलंदाजाला यश मिळालं नाही. अर्शदीप सिंगने 10 षटकात 72 धावा दिल्या. तर गुरनूर ब्रार हा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने 10 षटकात 97 धावा दिल्या. तर अक्षर पटेलने फिरकीच्या जोरावर काही अंशी इंग्लंडच्या धावगतीला ब्रेक लावला. त्याने 10 षटकात एकही गडी बाद केला नाही, पण 61 धावा दिल्या. या सामन्यात प्रसिद्ध कृष्णाची गोलंदाजी प्रभावी ठरली. प्रसिद्ध कृष्णाने 10 षटकात 69 धावा दिल्या आणि दोन विकेट काढल्या. यात स्पेलमध्ये दोन षटकं निर्धाव टाकली.
महत्वाच्या बातम्या:
BCCI On Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं…