Pune Moshi Building Collapse: मोशी इमारत दुर्घटनेच्या शोधकार्य (Rescue Operation) अखेर पूर्ण झालं आहे. तब्बल 81 तास लागले. बुधवारी दुपारी 2 वाजता सुरु झालेलं शोधकार्य मध्यरात्री 1 वाजता संपलं. या दुर्घटनेत 9 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर सुदैवाने 14 कामगार बचावले आहे.पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (PCMC) मोशी येथील कचरा डेपोतील ‘वेस्ट टू एनर्जी’ (Waste-to-Energy) प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळल्याची दुर्घटना घडल्यानंतर आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. (Pune Moshi Building Collapse)
दरम्यान, इमारतीच्या केवळ तळमजल्यालाचं पूर्णत्वाचा दाखला असताना, पहिला आणि दुसरा मजला कसा काय उभारला? तो कोणाच्या परवानगीने वापरात आला? पर्यावरण विभागाचे ते अधिकारी की संबंधित कंत्राटदार, दोष नेमका कोणाचा? कचऱ्याचे ढीग एकावर एक रचत त्याचा डोंगर झाला, त्याकडे पालिकेच्या कोणकोणत्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं? अशा सर्वांवर कारवाई अपेक्षित आहे. पण चौकशी समितीत कोणाला दोषी धरलं जाणार का? की केवळ चौकशीचा फार्स केला जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
नेमकं काय घडलं? (Pune Moshi Building Collapse)
पुण्यातील मोशी परिसरातील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा प्रचंड ढिगारा घसरून प्रशासकीय इमारतीवर कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली. मोशीतील ही दुर्घटना बुधवार, 8 जुलै 2026 रोजी दुपारी सुमारे 1.30 वाजता घडली. मुसळधार पावसामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) मोशी येथील कचरा डेपोमधील ‘लेगसी वेस्ट’चा प्रचंड ढिगारा घसरून वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाच्या तीन मजली प्रशासकीय इमारतीवर कोसळला. या दुर्घटनेत अनेक कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकले आणि त्यानंतर NDRF, अग्निशमन दल व इतर यंत्रणांकडून मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू करण्यात आले.
या दुर्घटनेत इमारतीचा मोठा भाग कोसळून अनेक कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकले. सुरुवातीला अनेक जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले, मात्र काही कर्मचारी अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. बचावकार्यासाठी NDRF, अग्निशमन दल, लष्कर आणि इतर आपत्कालीन यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत असून विषारी वायू, अस्थिर इमारत आणि सततचा पाऊस यामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. या घटनेनंतर कचरा व्यवस्थापन, सुरक्षा उपाययोजना आणि प्रशासकीय निष्काळजीपणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा