Bhutam Bhayam Jathai Look: भीतीदायक चेहरा, भेदक नजर, अंगभर लोळणाऱ्या जटा.. ‘भूतम भयम्’ मधील ‘जठाई’च्या खतरनाक लूकची चर्चा; अभिनेत्रीला ओळखलंत?


Bhutam Bhayam Jathai Look Marathi Actress: मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या हॉरर कॉमेडी चित्रपटांची जोरदार चलती आहे. नुकत्याच येऊन केलेल्या ‘तुंबाडची मंजुळा’ या चित्रपटाने प्रेक्षकांची पसंती मिळवल्यानंतर आणखी एका हॉरर कॉमेडी चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. नुकत्याच या बहुचर्चित चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला. केवळ हॉरर नाही तर रहस्य आणि विनोदाचा भन्नाट मेळ ‘भूतम भयम् ‘ (Bhutam BHayam)  या चित्रपटात दिसणार आहे.या चित्रपटातील आणखी एका खतरनाक पात्राची, त्याच्या लूकची चर्चा रंगलीय. भीतीदायक चेहरा, भेदक नजर, पारंब्याएवढ्या मोठ्या जटा, गळ्यात कसल्याशा माळा चेटकिणीसारख्या दिसणाऱ्या लुकमधील अभिनेत्री नेमकी आहे तरी कोण? असा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय. या टीझरनंतर चित्रपटाबद्दल झालेली उत्सुकता आणि नव्या पोस्टरमुळे निर्माण झालेलं कुतूहल सध्या वाढलंय. (Marathi Horror Comedy Movie)

भूतं भयम् चित्रपटाच्या थरारक पोस्टरची चर्चा

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भूतमभयम या चित्रपटाच्या टिझरची चर्चा तर रंगली आहेच. पण त्याबरोबरच आणखी एका महत्त्वाच्या पात्राचं पोस्टर प्रदर्शित झाल्याने एकच चर्चा रंगलीय. हे पात्र आहे ‘जठाई’! या पात्राचं अंगावर काटा आणणारं पोस्टर पाहून प्रेक्षकांना प्रश्न पडलाय की, ही भूमिका नेमकं साकारतंय कोण? भीतीदायक चेहरा, एखाद्याला खिळवून ठेवणारी तीक्ष्ण भेदक नजर, अंगावर लोळणाऱ्या केसांच्या लांबलचक जटा , हातावरच्या ताणलेल्या नसा, पडक्या वाड्याच्या पार्श्वभूमीवर बसलेली ही बाई पाहणाऱ्याला हादरवून सोडणारी आहे. या पात्राभोवती तयार झालेलं रहस्यमय वलय पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. ‘भुतम भयम’ या चित्रपटात जठाई नावाचे हे पात्र प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. ही जठाई कथानकात काय रहस्य दडवून ठेवते? याचा उलगडा मात्र, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच होणार आहे. हे पात्र कोणी साकारलंय याची उत्सुकताही आहे. हे अंगावर काटा आणणारं पात्र अभिनेत्री छाया कदम साकारणार आहे.त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

 

साडेतीन तासांचा प्रोस्थेटिक मेकअप

आपल्या भूमिकेविषयी अभिनेत्री छाया कदम म्हणाल्या ‘कलाकार म्हणून कायमच मला काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असते.अशी वेगळी आणि आव्हानात्मक व्यक्तिरेखा आपल्या वाट्याला यावी, अशी माझी कायम अपेक्षा असते.भूतम भैया मधील जठाई ही माझ्या कारकिर्दीतील सर्वात वेगळ्या भूमिकांपैकी एक आहे.तिचं दिसणं बोलणं, हसणं, चालणं या प्रत्येक गोष्टीवर मला विशेष मेहनत घ्यावी लागली आहे.विशेष म्हणजे ती गिब्रिश भाषेत बोलते.आणि ही भाषा आत्मसात करणं माझ्यासाठी फार मोठा आव्हान होतं.यासाठी संपूर्ण टीमने मला खूप साथ दिली.या भूमिकेसाठी दररोज सुमारे साडेतीन तास प्रोस्थेटिक मेकअप करावा लागायचा आणि तो काढायलाही जवळपास तेवढाच वेळ जायचा’ असं त्या म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या ‘इतका जड मेकअप आणि वेशभूषा परिधान करून काम करणं हे फार आव्हानात्मक होतं. माझ्या प्रत्येक हालचालींवर मर्यादा यायच्या.पण जठाईचा व्यक्तिमत्व पडद्यावर प्रभावी दिसावे यासाठी संपूर्ण टीम ने मेहनत घेतली आहे.अशा वेगळ्या भूमिका साकारताना कलाकार म्हणून वेगळंच समाधान आणि आनंद मिळतो.प्रेक्षकांना जठाई चा लूक आणि तिचा रहस्यमय व्यक्तिमत्व नक्कीच लक्षात राहील असं मला विश्वास आहे. असं छाया कदम म्हणाल्या. 

चित्रपटात प्रेक्षकांची लाडकी ‘ऑरेंज ज्यूस गँग’ अर्थात करण सोनावणे, नील साळेकर, सौरभ घाडगे, शुभम जाधव, सिद्धांत सरफरे, मनमीत पेम आणि पुष्कराज चिरपुटकर यांची जबरदस्त स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली असून, येत्या 24 जुलै रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *