Pune Ketan Agarwal Murder : भर उन्हाळ्यात आरोपीची एक चूक अन् पोलिसांची सेकंदात पडकलं! लोहगडावर बिझनसमॅनच्या पोराला कुणी मारलं? | पुणे बातम्या (Pune News)


Last Updated:

Pune Lohagad Ketan Agarwal Murder Case : एक तरूण भर उन्हाळ्याच्या दिवसात हुडी घालून, कानात हेडफोन लावून आणि चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत हा तरुण परिसरात फिरताना दिसल्याचं तपासात समोर आलं.

Pune Lohagad Ketan Agarwal Murder Case
Pune Lohagad Ketan Agarwal Murder Case

Pune Crime News (वैभव सोनवणे, प्रतिनिधी) : पावसाची चाहूल लागताच पुणेकरांना ट्रेकिंगचं वेड लागतं. अनेकजण पुण्याच्या जवळपासच्या किल्ल्यांवर भटकंती करण्यासाठी येत असतात. त्यातील पुण्यातील लोहगड हा एक किल्ला… लोहगडावर पर्यटकांची मोठी झुंबड पहायला मिळते. अशातच लोहगडावरून हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. चार दिवसापूर्वी लोहगडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या केतन अग्रवाल या तरुणाचा गडावरून पडून मृत्यू झाला होता. लोहगडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या केतन अग्रवाल याला सेल्फीचा मोह आवरला नाही अन् तो पाय घसरून पडला, अशा संशय पहिल्यांदा व्यक्त केला जात होता. अशातच आता त्याची हत्या झाल्याचं पोलिसांच्या चौकशीत समोर आलं आहे.

लोहगडावर ट्रेकिंगसाठी गेले होते अन् घात झाला

केतन अग्रवाल हा मोठ्या व्यावसायिक कुटुंबातील तरुण होता. जयपूरमध्ये त्याचं लग्न होणार होतं. लग्नासाठी दोन विमानं बुक करण्यात आली होती आणि मोठ्या थाटामाटात विवाह सोहळ्याची तयारी सुरू होती. लग्नाआधी होणाऱ्या पत्नी सियाच्या वाढदिवसानिमित्त दोघं लोहगडावर ट्रेकिंगसाठी गेले होते. मात्र तिथंच त्याचा घात झाला. पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर होणाऱ्या पत्नीनेच घात केल्याचा खुलासा पोलिसांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांना एक गोष्ट खटकली होती.

पोलिसांनी तिथंच संशय आला

पोलिसांनी सीसीटीव्ही चेक केले तेव्हा त्यांनी एक गोष्ट नोटीस केली. एक तरूण भर उन्हाळ्याच्या दिवसात हुडी घालून, कानात हेडफोन लावून आणि चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत हा तरुण परिसरात फिरताना दिसल्याचं तपासात समोर आलं. पोलिसांनी तिथंच संशय आला अन् पोलिसांनी या पोराचा तपास सुरू केला. यानंतर धक्कादायक खुलासे समोर आले.

केतनच्या मृत्यूमागे कट

दरम्यान, पोलिसांच्या तपासानुसार, केतनच्या मृत्यूमागे कट असल्याच समोर आलं आहे. या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया आणि तिच्या मित्रावर आरोप करण्यात आलं असून पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे. मोठ्या थाटामाटात होणाऱ्या लग्नाच्या काही दिवस आधी घडलेली ही घटना आता हत्येच्या तपासापर्यंत पोहोचली आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आता पुढील कारवाई सुरू केलीय

मराठी बातम्या/पुणे/

Pune Ketan Agarwal Murder : भर उन्हाळ्यात आरोपीची एक चूक अन् पोलिसांची सेकंदात पडकलं! लोहगडावर बिझनसमॅनच्या पोराला कुणी मारलं?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *