Tilak varma : याला म्हणतात जिगरी! पुण्यातील आमदार मित्राच्या शपथविधीसाठी क्रिकेटर तिलक वर्माची विधीमंडळात खास उपस्थिती | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)


Last Updated:

Tilak Varma in MLA Vikram Kakade Oath Ceremony : टीम इंडियाचा टी-ट्वेंटीचा व्हाईस कॅप्टन तिलक वर्मा हा महाराष्ट्राच्या विधिमंडळात पोहोचला होता. त्याचा मित्र आता आमदार झाल्याने त्याच्या शपथविधीसाठी तिलकने हजेरी लावली होती.

Tilak Varma in MLA Vikram Kakade Oath Ceremony
Tilak Varma in MLA Vikram Kakade Oath Ceremony

Tilak Varma in Maharashtra Vidhan Bhavan : संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट झाला आहे. 17 पैकी 6 जागेचा निकाल आधीच लागला होता. या सहाच्या सहा जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. तर 11 जागेवर निवडणूक पार पडली. अशातच बिनविरोध निवडून आलेल्या आमदारांचा शपथविधी सोहळा आज पार पडला. विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी टीम इंडियाचा क्रिकेटर तिलक वर्मा देखील उपस्थित होता. आपल्या पुण्याच्या मित्राच्या शपथविधीसाठी तो उपस्थित होता.

राष्ट्रवादीचे बिनविरोध आमदार विक्रम काकडे

तिलक वर्माचा हा मित्र दुसरा तिसरा कुणी नसून पुण्याचे राष्ट्रवादीचे बिनविरोध निवडून आलेले आमदार विक्रम काकडे आहेत. विक्रम काकडे आणि तिलक वर्मा खूप आधीपासून मित्र आहेत. मित्राने राजकीय करियरमध्ये आणखी एक पाऊल टाकल्याने तिलक वर्माचा आनंद गगनात मावत नव्हता. विधिमंडळात जाण्याआधी त्याने एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना आनंद व्यक्त केला.

मी त्याला लहानपणापासून ओळखतो… – तिलक वर्मा

मला आज खूप छान वाटतंय की, माझा मित्र आज शपथ घेतोय. तो खूप चांगला माणूस आहे. लोकांना तो खूप मदत करतो. मी त्याला लहानपणापासून ओळखतो. मला आनंद झाला जेव्हा त्याला सीट मिळाली होती, मला विश्वास आहे की, तो देशासाठी आणि लोकांसाठी काहीतरी करून दाखवेल. तो त्याच्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करत आहे मी माझा क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करत आहे, असंही तिलक वर्मा यावेळी म्हणाला.ॉ

श्रीलंका सेंच्युरी – तेलंगाना सेंच्युरी – मुंबई शपथविधी…

दरम्यान, तुम्हाला माहिती असेल तर परवा दिवशी तिलक वर्मा श्रीलंकेत होता. तिथं त्याने मॅच विनिंग खेळी केली अन् तो तातडीने तो काल सकाळी तेलंगानाला आला. सकाळी पोहोचल्यानंतर आराम न मिळता त्याला रात्री मॅच खेळावी लागली. तिलकने मॅचच खेळली नाही तर 56 बॉलमध्ये 136 धावांची खेळी केली. काल मॅच जिंकली नाही तोपर्यंत तो तातडीने मुंबईला रवाना झाला अन् आज मित्राच्या शपथिविधीसाठी उपलब्ध होता.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/

Tilak varma : याला म्हणतात जिगरी! पुण्यातील आमदार मित्राच्या शपथविधीसाठी क्रिकेटर तिलक वर्माची विधीमंडळात खास उपस्थिती



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *