सुकृत हा अंबरनाथमध्ये राहणारा असून तो अभिनेता, कवी, विनोदी कलाकार आणि नाट्य कलाकारसुद्धा आहे. जवळपास सात वर्षांपासून तो मराठी रंगभूमी आणि मालिकांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारतोय. ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या या एपिसोडमध्ये तो शेवटपर्यंत त्याच्या भूमिकेशी पूर्णपणे एकनिष्ठ राहिला. या शोमध्ये सुकृतने एक भावपूर्ण कवितासुद्धा सादर केली.