Prasad Lad Meet Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंसमोर बोलताना प्रसाद लाड भावूक; ऑन कॅमेरा बोलताना नेमकं काय घडलं? VIDEO


Prasad Lad Meet Manoj Jarange Patil: भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) आज शुक्रवारी (दि. 22)अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भेट घेण्यासाठी गेले. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मनोज जरांगे यांनी दोन दिवसांपूर्वी प्रसाद लाड यांना अंतरवलीत येण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, 30 मेपासून पुन्हा आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे. मात्र, या भेटीपूर्वी एक धक्कादायक प्रकार समोर आला. छत्रपती संभाजीनगरमधील एका हॉटेलमध्ये प्रसाद लाड थांबले असताना दोघांनी हॉटेलमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. याआधी प्रसाद लाड यांच्या पीएला धमकीचा फोनही आला होता. या प्रकरणी योगेश शितोळे पाटील आणि गणेश उगले यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यानंतर प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी ऑन-कॅमेरा झालेल्या चर्चेदरम्यान बोलताना प्रसाद लाड भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

प्रसाद लाड म्हणाले की, माझे आणि मनोज जरांगे यांच्यात अनेकदा वाद झाले हे मला मान्य आहेत. ज्या पद्धतीने मराठा समाजाचा लढा 1981 पासून सुरू झाला. मनोज जरांगे यांनी लढा दिला, त्यामुळे माझ्या समाजाला आरक्षण मिळाले. त्या बद्दल मी मनोज दादा यांचे धन्यवाद मानतो. मी त्यांना विनंती केली की, देवेंद्र फडणवीस यांना देखील कधीतरी समजून घेतले पाहिजे. गेल्या 70 वर्षात कोणत्याच मराठा समाजाच्या नेत्याने केलं नाही ते फडणवीसांनी केलं आहे. 30 मे या दिवशी जरांगेंनी आंदोलन करू नये. उन्हाचे दिवस आहेत. मी आमदार, नेता म्हणून येथे आलेलो नाही. सामान्य समाजाचा माणूस म्हणून मी येथे आलो आहे. 

Prasad Lad Meet Manoj Jarange Patil: मी तुमचा लहान भाऊ म्हणून येथे आलोय

मनोज जरांगेंनी 23 तारीख दिली. पण, मी 22 तारखेलाच आलोय. तुम्ही आमंत्रण दिले, तुमचा मान म्हणून मी आलोय. तुमच्या मनात असलेला द्वेष दूर करायचा होता. आंदोलन करताना काही निर्णयांची ग्वाही दिली जाते. ते विषय सभागृहात नेतृत्व करत असताना माझ्या माध्यमातून कसा मार्ग निघेल ते पाहू. मी तुमचा लहान भाऊ म्हणून येथे आलोय, असे त्यांनी म्हटले. 

Prasad Lad Meet Manoj Jarange Patil: मी राजकारणावर धंदा करत नाही

प्रसाद लाड पुढे म्हणाले की, मला दादांबरोबर खाजगीत देखील चर्चा करायची आहे. दादांच्या सात-आठ मागण्या मी समजून घेणार आहे. मी भाऊ म्हणून विनंती करायला आलोय. मला काही काळ द्यावा लागेल. मी जातीसाठी माती खायला तयार आहे. आमच्यात आपापसात भांडणे लावायचे काम करत आहेत. मी जरांगे यांचे विषय सरकार दरबारी मांडणार आहे. मी वेळवेळी भेटत राहील. मी सरपंचाच्या शेतात ड्रॅगन फ्रुट देखील खायला येईल. एका मराठा समाजाचा मुलगा ज्याचे वडील कामगार होते. मी व्यावसायिक आहे, याचा मला अभिमान आहे. मी राजकारणावर धंदा करत नाही, असे देखील त्यांनी म्हटले. लक्ष्मण हाके यांच्याबाबत बोलताना प्रसाद लाड म्हणाले की, हाके साहेबांना पोटशूळ होण्याचे काम नाही. त्यांचा गैरसमज देखील मी दूर करेल. मनोज दादांचे अनेक वेळा मुख्यमंत्र्यांशी संवाद झालेत. ते आता सुद्धा थेट फोनवर मुख्यमंत्र्यांशी बोलू शकतात, असे त्यांनी म्हटले. 

Prasad Lad Meet Manoj Jarange Patil: माझ्या आईवरून शिव्या दिल्या

मराठा आंदोलकांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीआधी प्रसाद लाड यांना धमकी दिली होती. या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत विचारले असता प्रसाद लाड म्हणाले की, धमकीचे अनेक फोन येतात. काल काही लोकांनी मी राहत असलेल्या हॉटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांनी माझ्या आईवरून शिव्या दिल्या. माझ्या डोळ्यात पाणी आलं. शिव्या देणे सोपे असते. मात्र, हृदयाला ठेच लागते. मला सांगा मी कुठे येऊ, मला मारा, असे त्यांनी म्हटले.  

Manoj Jarange Patil Demands: मनोज जरांगे यांच्या मागण्या काय?

1) मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना 29 मे च्या आता कुणबी प्रमाणपत्र द्या.

2) सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे, मिरज संस्थांचा GR काढा. 1994 च्या धर्तीवरच GR काढा.

3) महाराष्ट्रातील सर्व सरसकट गुन्हे मागे घ्या. 

4) आंदोलनात बलिदान देणाऱ्या कुटुंबीयांना महावितरण आणि MIDC मध्ये नोकरीचा GR काढा. 

5) सारथीच्या सर्व योजना पुन्हा सुरू करा.

6) महामंडळाचे सर्व परतावे ताबडतोब वाटप केले पाहिजे. 

7) कुणबी प्रमाणपत्र दिलेले त्याची व्हॉलिडिटी द्या. 

8) मराठा उपसमिती काही कामाची नाही, अध्यक्षाला काम नाही. उपसमिती बरखास्त करा. 

9) स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा. 

10) शिंदे समितीला मुदतवाढ देऊन रेकॉर्ड तपासायला लावा.

आणखी वाचा 

Manoj Jarange Patil on Prasad Lad: जरांगेंच्या भेटीआधीच प्रसाद लाड यांना धमकीचा फोन, मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘मराठा समाजाला…’

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *