Prasad Lad On Manoj Jarange Patil : शाळेत महाविद्यालयात गेल्यावर 100% फी घेतली जात आहे. म्हणजे सरकारी आदेश काढला असताना असं का? म्हणजे शासन फक्त नावाला गीआर (GR) काढताय का? सरकार जर आदेश काढत असेल तर अधिकाऱ्यांना त्रास काय? असा सवाल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी प्रसाद लाड (Prasad Lad) यांना केला आहे. आम्हाला सवलती नेमक्या कधी लागू होणार, फी भरल्यावर काय अर्थ असणार आहे? कि तुम्हीच अधिकाऱ्यांना तसे आदेश देताय का? असे सवाल करत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी प्रश्नांची सरबत्ती लावली.
दरम्यान, यावर उत्तर देताना भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी मोठी घोषणा केली आहे. यावेळी ते म्हणाले, या कायद्यांची जो अधिकारी अंमलबजावणी करणार नाही त्यावर आम्ही कारवाई करू. शिवाय मुख्यमंत्र्याना भेटून मी हा विषय कानावर घालतो. सोबतच ज्यांनी शालेय फी भरली असेल त्यांना त्यांची फी परत देऊ, तसेच मराठा उपसमितीच्या बैठकीत या संदर्भात चर्चा करू. किंबहुना सोमवारपर्यंत सर्व शाळा महाविद्यालयांना या संदर्भात आदेश पारित करू.असा शब्द प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे.
Prasad Lad: मराठा उपसमितीच्या बैठकीत या संदर्भात चर्चा करू
या कायद्यांची जो अधिकारी अंमलबजावणी करणार नाही त्यावर आम्ही कारवाई करू. शिवाय मुख्यमंत्र्याना भेटून मी हा विषय कानावर घालतो. सोबतच ज्यांनी शालेय फी भरली असेल त्यांना त्यांची फी परत देऊ तसेच मराठा उपसमितीच्या बैठकीत या संदर्भात चर्चा करू. किंबहुना सोमवारपर्यंत सर्व शाळा महाविद्यालयांना या संदर्भात आदेश पारित करू.असा शब्द प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे.
Prasad Lad: माझ्या शब्दाने उपोषण मागे घेतलं त्यासाठी मी आभार मानतो
माझ्या शब्दाने मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी उपोषण मागे घेतलं. त्यासाठी मी आभार मानतो. पण इथून पुढे त्यांनी आंदोलन करू नये. अशी विनंती भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे. अंतरवली सराटीत भेटीनंतर प्रसाद लाड यांनी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. तर पुढे बोलताना ते म्हणाले कि, मनोज दादांनी उपोषणाला बसू नये, ही विनंती मी केली होती. त्यांची तब्येतीची काळजी होती, त्यांनी आमच्या शब्दावर उपोषण मागे घेतले. सरकारने जेवढे फास्ट GR गेल्या 15 दिवसात झाले ते आजवर कधीच झाले नाही. मी सेतू बनण्याचे काम केले. Midc मध्ये नोकरी विषयक तत्काळ परिपत्रक काढण्यात आले. आंदोलनातील मृतांच्या कुटुंबियांना मदत करण्यात आली आहे. माझ्या मराठा बांधवांना दादांच्या प्रयत्नाने मदत झाली आहे. आता आम्ही SOP बनवावी ही मागणी होतो, ती आम्ही त्यांना दाखवून बनवली. तर हैदराबाद गॅझेट बाबत प्रमाणपत्राच्या व्हॅलेडिटीसाठी काही नियमावली बनवली आहे. आचारसंहिता 22 तारखेपर्यंत आहे. त्याची काही दिवस अडचण आहे.
Prasad Lad : कोणत्याही अधिकाऱ्यांनी शुक्राचार्य बनन्याच काम केल्यास सोडणार नाही
1 तारखेपासून 614 अर्ज आलेत. शिंदे समितीची मुदत वाढ देखील आम्ही दिलेली आहे. 58 लाख नोंदीची आम्ही हार्ड डिस्क त्यांना देणार आहोत. तो डेटा आहे, त्यावर एक कक्ष काम करत आहेत. कोणत्याही अधिकाऱ्यांनी शुक्राचार्य बनन्याच काम केल्यास त्याला आम्ही सोडणार नाहीत. असा सज्जड दमही आमदार प्रसाद लाड यांनी यावेळी दिला आहे. सर्व समाज आमच्यासाठी सारखे आहेत. मला उपस्मितीचे निमंत्रण आहे. सदस्य म्हणून सहभागी व्हावे, असं सांगण्यात आलं आहे. 964 पैकी 902 गुन्हे मागे घेण्याचे काम केले आहे. ऑफ दे रेकॉर्ड काही कामे मला मुलांनी इथे आल्यावर सांगितले. आज दादा बरोबर बसून मी जेवण करणार आहे. असेही ते म्हणाले.
Prasad Lad On Manoj Jarange Patil : …तर मी माफी मागतो.
आपण सातत्याने मदत करणार आहोत. मुख्यमंत्री अतिशय पॉझिटिव्ह काम करत आहेत. स्वतंत्र मराठा कक्ष स्थापन करण्याचे काम होणार आहे. माझ्याकडून काही काम करत असताना चूक झाली असेल तर मी माफी मागतो. मागच्या आंदोलनात जो अपघात झाला, त्याला देखील मदत करण्याच काम झाले, भरीव आर्थिक मदत केली.
Raut vs Mahajan Operation Tiger : फोडाफोडी Vs तुडवातुडवी;गिरीश महाजन संजय राऊत भिडले Special Report