Post Office RD Scheme : दरमहा फक्त 4000 रुपयांची पोस्टाची RD ठरेल गेमचेंजर, 5 वर्षात किती फंड जमणार, कर्ज काढण्याची सुविधा उपलब्ध, जाणून घ्या


नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळं आणि क्रूड ऑईलचे दर वाढल्यानं शेअर बाजारात घसरण होत आहे. शेअर बाजारातील तेजी आणि घसरणीमुळं जोखीम वाढली आहे. तुम्हाला जर आर्थिक जोखीम न घेता गुंतवणूक करुन चांगला परतावा मिळवायचा असेल तर भारतीय पोस्टातर्फे चालवली जाणारी नॅशनल सेविंग्ज रिकरिंग डिपॉझिट अकाऊंट (आरडी)  योजना महत्त्वाची ठरु शकते. पोस्टाकडून या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 6.7 टक्के व्याज दिलं जातं. याशिवाय कम्पाऊंडिंगचा फायदा देखील मिळतो. आर्थिक अडचण निर्माण झाल्यास कर्ज देखील मिळू शकतं. 

भारतीय पोस्टाच्या नॅशनल सेविंग्ज रिकरिंग डिपॉझिट अकाऊंट (आरडी) मध्ये 5 वर्ष गुंतवणूक करणं हा चांगला पर्याय आहे. कारण या गुंतवणुकीला शासनाची हमी असते. यामध्ये तुम्ही दरमहा 4000 रुपयांची गुंतवणूक केल्यास 5 वर्षात व्याज किती मिळणार, मॅच्युरिटीनंतर किती पैसे हाती येणार ते जाणून घेऊयात. 

तुम्ही जर पोस्ट ऑफिसच्या 5 वर्षांच्या आरडीमध्ये दरमहा 4000 रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला तर तुमची गुंतवणूक     2 लाख 40 लाख रुपये होईल. या योजनेत दर तीन महिन्यांनी चक्रवाढ पद्धतीनं व्याज दिलं जाईल. जे 45463 रुपये असेल. म्हणजेच गुंतवणूकदाराला 5 वर्षानंतर मिळणारी रक्कम 2 लाख 85 हजार 463 रुपये असेल. म्हणजेच कोणत्याही अधिक आर्थिक दबावाऐवजी तुम्ही गुंतवणूक करुन चांगला फंड तयार करु शकता. 

काही लोक पाच वर्षे कालावधी असल्यानं पैसे अडकून पडण्याच्या भीतीनं गुंतवणूक करणं टाळतात. मात्र, भारतीय पोस्टाची आरडी सुरु केल्या तुम्हाला आर्थिक अडचण असल्यास कर्ज स्वरुपात काही रक्कम मिळू शकते. मात्र, त्यासाठी तुम्ही सलग 12 महिने आरडीमध्ये पैसे भरलेले असणं आवश्यक आहे. समजा 12 महिने 4000 रुपयांची आरडी सुरु ठेवल्यास एका वर्षात तुम्ही जमा केलेली रक्कम 48000 हजार रुपये असेल. यासह जे व्याज जमा झालं असेल ते मिळून खात्यातील शिल्लक रक्कम असेल त्याच्या 50 टक्के रक्कम कर्ज म्हणून मिळेल. या कर्जाचा व्याज दर 8.7 टक्के असेल. पोस्टाकडून आरडीवर दिल्या जाणाऱ्या व्याजाच्या दोन टक्के व्याज दर अधिक असतो. कर्जाची परतफेड एकाच वेळी किंवा समान हप्त्यांमध्ये देखील करु शकता.

जर एखाद्या गुंतवणूकदाराला आर्थिक अडचण आली तर तो 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी पैसे काढू शकतो. त्यासाठी  खातं उघडल्यानंतर 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होणं आवश्यक आहे.  3 वर्षानंतर आरडी बंद केल्यास पोस्ट ऑफिस सेविंग्ज अकाऊंटच्या व्याज दरानं म्हणजे 4 टक्के व्याज दरानं व्याज दिलं जाईल. 

दरम्यान, ही योजना शेअर बाजारातील किंवा म्युच्युअल फंडमध्ये जी जोखीम असते ती उचलू शकत नाहीत त्यांच्यासाठी फायदेशीर आहे. याशिवाय छोट्या गुंतवणूकदारांसाठी देखील ही योजना महत्त्वाची ठरते.  मुलांचं शिक्षण, लग्न, किंवा घरातील मोठ्या वस्तूच्या खरेदी आणि 5 वर्षांचं लक्ष्य ठेवून गुंतवणूक करणाऱ्या कुटुंबासाठी ही योजना फायदेशीर ठरेल. नॅशनल सेविंग्ज रिकरिंग डिपॉझिट अकाऊंट (आरडी) मध्ये 6.7 टक्के व्याज दिलं जातं. मात्र सरकार दर तीन महिन्यानंतर स्मॉल सेविंग्ज स्कीम्सच्या व्याज दरांचा आढावा घेतला जातो.

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *