Eknath Shinde on Amit Shah: राजकारणातले चाणक्य अमितभाई, मोदींचा विश्वास अमितभाई, विकासपुरुष अमित भाई, पोलादी पुरुष अमितभाई, असे आमचे अमितभाई आहेत याचा आम्हाला अभिमान असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे आज (20 जून) कोल्हापूर दौऱ्यावर असून इचलकरंजीमध्ये जवाहर साखर कारखान्याचे नामविस्तार कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखाना असे करण्यात आलं आहे. या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रमुख उपस्थित आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित होते. तसेच जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख मंत्री उपस्थित होते.
दहशतवादीचा कर्दनकाळ अमित भाई
एकनाथ शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 वर्षे पद सांभाळत विक्रम केला. त्यांनी सांगितले की, काश्मीरमधून 370 कलम हटवलं. घुसखोरी केलेल्यांना बाहेर काढलं. दहशतवादीचा कर्दनकाळ अमित भाई आहेत. नक्षलवाद्यांचा कर्दनकाळ अमितभाई आहेत, सहकारमधून समृद्धीकडे जात आहोत. गृहमंत्री म्हणून त्यांनी ठसा उमटवला आहे. आता सहकार मंत्री म्हणून देखील ते काम करत आहेत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
‘विकास भी, विरासत भी’ या मंत्राखाली काम सुरू
दरम्यान, कोल्हापुरात कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, माता अंबाबाईच्या निवासस्थानी महाराष्ट्र सरकार जीर्णोद्धार आणि कॉरिडोअरचे काम करत आहे. यामुळे देशभरातील भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हा कॉरिडोअर 1500 कोटी रुपयांच्या खर्चातून 28 हजार चौ. मीटर जागेवर उभारला जाईल. यामुळे 7व्या शतकातील हे मंदिर पुन्हा नव्या ऊर्जेने भक्तांच्या स्वागतासाठी सज्ज होईल पुरातत्व विभागाशी चर्चा करून आसपासच्या 41 लहान-मोठ्या मंदिरांचे जतन करत हे काम केले जाईल. संपूर्ण मंदिर परिसरात आधुनिक एआय (AI) कॅमेरे, एलईडी प्रकाश व्यवस्था, आउटडोर गॅलरी, लाईट अँड साऊंड शो, बहुउद्देशीय हॉल, अन्नछत्र आणि पोलीस चौकी यांसारख्या सुविधा 6 महिन्यांत पूर्ण केल्या जातील.
देशात ‘विकास भी, विरासत भी’ या मंत्राखाली काम सुरू आहे. अयोध्येतील भव्य राम मंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडोअर, केदारनाथ-बद्रीनाथ धाम, सोमनाथ मंदिर आणि कामाख्या कॉरिडोअरनंतर आता अंबाबाईचा कॉरिडोअर बनत आहे. देशाच्या सुरक्षिततेचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, देशाच्या सीमांमधून होणारी घुसखोरी पूर्णपणे बंद केली जाईल आणि देशभरातील घुसखोरांना बाहेर काढले जाईल.
इतर महत्वाच्या बातम्या
Sushma Andhare On Krishna Ashtikar : कृष्णा आष्टीकर तू उद्धव ठाकरेंसोबत असशील तर उद्या बापाचं पिंडदान करुन दाखव- सुषमा अंधारे