Pandharpur News: चोरी करायला आल्या अन् चोप मिळाला! पंढरपुरात महिलांचा रुद्रावतार; चोरांना शिकवला धडा! | सोलापूर बातम्या


Last Updated:

Pandharpur News: विठ्ठल मंदिर परिसरात वारकरी महिलांचे मंगळसूत्र आणि सोन्याच्या चैन चोरी करण्याचे सत्र या टोळीने सुरू केले असून, नुकतीच एक चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

चोरी करायला आल्या अन' चांगल्याच चोपल्या! पंढरपुरात महिला वारकऱ्यांचा रुद्रअवतार; चोरांना शिकवला धडा!
चोरी करायला आल्या अन’ चांगल्याच चोपल्या! पंढरपुरात महिला वारकऱ्यांचा रुद्रअवतार; चोरांना शिकवला धडा!

विरेंद्रसिंह उत्पात, प्रतिनिधी, सोलापूर : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात भाविकांची अलोट गर्दी सुरू झाली आहे. मात्र, याच गर्दीचा फायदा उठवण्यासाठी पंढरपुरात महिला चोरांची एक मोठी टोळी दाखल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विठ्ठल मंदिर परिसरात वारकरी महिलांचे मंगळसूत्र आणि सोन्याच्या चैन चोरी करण्याचे सत्र या टोळीने सुरू केले असून, नुकतीच एक चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

गर्दीत घुसून मंगळसूत्र लांबवण्याचा डाव

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपुरात दाखल झालेली ही महिला चोरांची टोळी भाविकांच्या, विशेषतः महिला वारकऱ्यांच्या गर्दीचा गैरफायदा घेत आहे. विठ्ठल मंदिर परिसरातील एका बांगड्यांच्या दुकानात महिलांची गर्दी असताना, या टोळीतील महिलांनी एका भाविक महिलेचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे.

महिला भाविकांनी शिकवला धडा!

मंगळसूत्र चोरी होत असल्याचे लक्षात येताच दुकानात आणि परिसरात उपस्थित असलेल्या महिलांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. चोरी करणाऱ्या संशयित महिलांना उपस्थित महिलांनी रंगेहात पकडले आणि त्यांचा चांगलाच पाहुणचार करत मोठा चोप दिला. मंदिर परिसरात काही वेळ यामुळे मोठी खळबळ उडाली होती. यानंतर भाविकांनी संबंधित संशयित महिलेला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

पोलीस प्रशासनाचे भाविकांना आवाहन

आषाढीच्या तोंडावर चोरीच्या घटना वाढल्याने पोलिसांनी मंदिर परिसर आणि मुख्य बाजारपेठेत बंदोबस्त वाढवला आहे. या टोळीत आणखी किती महिला सामील आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत. पंढरपुरात येणाऱ्या सर्व भाविकांनी, विशेषतः महिलांनी गर्दीच्या ठिकाणी वावरताना आपल्या दागदागिन्यांची आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *