मुंबईतील ऐतिहासिक एअर इंडिया इमारत आजपासून शासनाच्या ताब्यात; मंत्री शिवेंद्रराजेंकडून पाहणी, किती कोटींना खरेदी?
मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबईच्या (Mumbai) नरिमन पॉईंट येथील ऐतिहासिक ‘एअर इंडिया’ (Air india) इमारतीचे महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतरण झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (shivendra bhosle) यांनी आज इमारतीची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी मंत्री भोसले यांनी शासकीय कार्यालयांचे स्थलांतर करण्यापूर्वी इमारतीची सखोल स्ट्रक्चरल तपासणी करण्यात यावी तसेच आवश्यक दुरुस्तीची कामे…